ठाकूर सावदेकर विडी कंपनी त्वरित चालू करून कामगारांना नुकसान भरपाई दया. :-कामगार सेनेची मागणी

लोकदर्शन👉 मोहन भारती


*सोलापूर दिनांक :- २८/१२/२०२१ :-* सोलापूर शहरातील ठाकूर सावदेकर विडी कंपनीच्या व्यवस्थापनानी कारखाना ४ ते ५ दिवस बंद ठेवले आहे . त्यामुळे कामगारांना विनाकारण आर्थिक नुकसान , त्यांचे उपासमार होत आहे म्हणून ठाकूर सावदेकर विडी कारखाना त्वरीत चालू करुन विडी कामगारांना नुकसान भरपाई देण्यात यावे . अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सहायक कामगार आयुक्त यांना देण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी दिले आहे .
सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात सोलापूरातील ठाकूर सावदेकर विडी उत्पादन करण्याच्या व्यवस्थापनानी वार्षिक हिशोबांचा कारण पुढे करून सर्व कामगारांना ४ ते ५ दिवस कारखाना बंद करून सूट्टी दिली आहे . त्यामूळे गरीब महिला विडी कामगार व कंपनीच्या इतर कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे . आणि उपासमार देखील होत आहे . सदया विडी कामागारांना एकतर पुरेसे काम मिळत नाही . त्यात भर म्हणून कंपनीचा कामकाजासाठी कामगारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे . म्हणून सदर बाबी सहाय्यक कामगार आयुक्त या नात्याने आपण गरीब कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्याची आर्थिक नुकसान व उपासामारी रोखण्यासाठी त्वरीत ठाकुर विडी कंपनी चालू करून कामगारांना काम द्यावे हि आमची मागणी आहे.
तरी मानीयांनी वरील कामगारांचा बाबतीत सहानभुतीपूर्वक विचार करून ठाकूर सावदेकर कारखाना त्वरीत चालू करावे. कामगारांना नुकसान भरपाई मिळवून देऊन व कामगारांना न्याय द्यावे ही विनंती. असे नमूद करण्यात आले आहे.
श्री. विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्याच्या शिष्ट मंडळात शोभा पोला, याल्लव्वा पैटा, गुरुनाथ कोळी, हरिदास शेरला यांचा सह विडी कामगार उपस्थित होते.
==================.===========
*फोटो मॅटर :- ठाकुर सावदेकर विडी कंपनी त्वरीत चालू करून विडी कामगारांना नुकसान भरपाई देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सरकारी कामगार अधिकारी श्री अशोक कांबळे साहेब यांना देण्यात आले सदर प्रसंगी श्री. विष्णु कारमपुरी ( महाराज ) शोभा पोला , याल्लव्वा पेटा , हरीदास शेरला आदि दिसत आहेत.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *