इन्फंट कान्व्हेंट येथे गणित दिवस उत्साहात संपन्न.

लोकदर्शन 👉मोहन भारती


राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल येथे भारताचे महान गणितज्ञ रामानुजन यांच्या जयंतीचे औचित्य साधून गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी इन्फंट कान्व्हेंट च्या विद्यार्थ्यांनी गणित विषयावर आधारित विविध प्रकल्प, माॅडेल, गणित सुत्रांचे चार्ट अशा विविध वस्तूंचे प्रात्यक्षिके सादर केली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे संचालक अभिजित धोटे यांनी सांगितले की लवकरच इन्फंट कान्व्हेंट येथे अत्याधुनिक सुविधा संपन्न गणित लॅब चे निर्माण करण्यात येणार असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना अधिक सोप्या पद्धतीने गणित विषय समजून घेण्यासाठी मदत होईल.
या प्रसंगी संस्थेचे सचिव अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, गणित शिक्षक विद्या चौधरी, संतोष सागर, मिनिक्षी अटाळकर, नगमा अंसारी, अश्विनी मत्ते, जया देरकर यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here