हनुमान मंदिरात श्री प्रभू रामचंद्र च्या मुर्ती ची प्राणप्रतिष्ठापणा,,

By : Mohan Bharti

25 ते 27 डिसेंबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

गडचांदूर : शहरातील पुरातन हनुमान मंदिरात श्री गणेश व मर्यादापुरुषोत्तम श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती ची प्राणप्रतिष्ठापना 27 डिसेंबर ला करण्यात येणार आहेत, त्या निमित्ताने 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर पावेतो विविध धार्मिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहेत. सर्व मुर्ती ची प्राणप्रतिष्ठापणा ब्रह्मर्शी रामेश्वर, आचार्य वनोजुला,नरेश शर्मा वनोजुला,श्रीधर आचार्य पंडित यांच्या शुभहस्ते होईल.25 डिसेंबर ला पहाटे 5 वाजता काकडआरती,त्या नंतर गणपती पूजन,गोमातापूजन, ब्रह्मकलश स्थापना, मूर्ती चे पंचामृत अभिषेक, भजन कार्यक्रम होईल. 26 डिसेंबर ला काकडआरती ,श्रीराम प्रभूची पालकी,शोभायात्रा, धान्यव फख शह्यांद्रवास,भजन होईल. 27 डिसेंबर ला काकडआरती,यंत्रस्थापणा ,मूर्ती स्थापना, हवन, महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन हनुमान मंदिर देवस्थान तथा गडचांदूर नगरवासी नी केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here