रामचंद्रराव धोटे महाविद्यालयात राज्यशास्र अभ्यास मंडळाची स्थापना.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– रामचंद्रराव धोटे महाविद्यालय राजुरा येथे महाविद्यालयाचे प्राचार्य तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रफुल्ल शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली.
यात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष अनिकेत रासपल्ले, सानिया शेख, उपाध्यक्ष प्रेरणा बावणे, मुमिक्षा मून, सचिव सागर बोढे, पुनित फलके, सहसचिव संकेत खेडेकर तर सदस्य म्हणून नंदिनी मडावी, प्रांजली रासपल्ले, निखिल चौधरी, कैलाश देहारकर, गुरूदास नवघडे, दिव्याभारती मडावी, अजय लोखंडे, गणेश भिवनकर, आकाश खेकारे, शशीकूमार लेतकरी, दिपक कूमरे, मनोज कूमरे आदि विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, प्रा. समिर पठाण, प्रा. देवानंद चुनारकर, प्रा. यश्वीनी घोटेकर, लिपिक मिथलेश मुनगंटीवार, शिक्षकेतर कर्मचारी मनोज ठाकरे, भुषण चौधरी यासह सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here