कोरपना व जिवती नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवू – हंसराज अहीर*       

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर।


⭕*कोरपना व जिवती येथील बैठकीत हंसराज अहीर यांचा विश्वास*

चंद्रपूर – राजकारणातून समाजकारण ही भारतीय जनता पक्षाची विचारधारा व धोरण आहे. या धोरणानेच पक्षाला लोकांचा विश्वास जिंकता आला. लोकांचा पक्ष ही भाजपाची ओळख असल्याने ही ओळख कायम राखण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. कोरपना व जिवती नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवू असा विश्वास व्यक्त करुन या निवडणूकीत सर्वांनी अपार मेहनत घ्यावी असे आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. 11 डिसेंबर रोजी कोरपना व जिवती येथे पार पडलेल्या कार्यकत्र्यांच्या बैठकीत केले.
या बैठकीला कोरपना भाजपा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, भाजपा गडचांदुर शहर अध्यक्ष सतीश उपलंचीवार, राजु घरोटे, किशोर बावणे, अरूण मडावी, पुरूषोत्तम भोंगळे, कवडु जरीले, रमेश मालेकर, नगरसेवक अरूण डोहे, जयाताई धारणकर, तसेच जिवती येथील बैठकीत सुरेश केंद्रे, महेश देवकते, रातलुबाई जुमनाके, गजानन जुमनाके, नयनाजी जाधव, मेहबूब भाई, निशीकांत सोनकांबळे, भिमराव मेश्राम, रमेश पूरी, मंगाम सर, राजेश राठोड, अरविंद टोकरे, तुकाराम वारलवार, माधव निवले, गोपीनाथ चव्हाण, माधव कुळसंगे, मदनेजी, शंकर गेडाम तसेच भाजपाचे कोरपना व जिवती येथील भाजपाउमेदवारांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या बैठकीत हंसराज अहीर यांनी संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. नगरपंचायत निवडणुक लढणारे भाजपाचे उमेदवार लोकांच्या विश्वासाला पात्रा ठरतील कोरपना व जिवती शहराला विकासाचे नवे स्वरूप देण्यात कोणतीही कसर सोडणार नाही असा विश्वास व्यक्त करून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी निवडणुक जिंकण्याच्या भावनेतून प्रचाराची धुरा सांभाळावी अशा सुचना केल्या. यावेळी काँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांनी हंसराज अहिर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपा मध्ये प्रवेश केला. हंसराज अहिर यांनी पक्षाचा दुपट्टा देऊन त्यांचे स्वागत केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *