शासन मान्य ताडी (शिंदी) दुकाने विरोधात संघर्ष समितीचे साक्षरी मोहिम.                                                             

* लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- ०२/१२/२०२१ :-* महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन विभागाने संपुर्ण राज्यात पुनश्च ताडी (शिंदी) दुकाने सुरू करण्याचा प्रयत्न अति वेगाने सुरु आहे. सदर शासनमान्य ताडी (शिंदी) विरोधात महाराष्ट्र ताडी (शिंदी) दुकान विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आज दि. ०१/१२/२०२१ रोजी बापूजीनगर येथे साक्षरी मोहिम विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या अध्यक्षतेखाली व अनिल दंडगुळे, शुभांगी कलकेरी, शुभम कलकेरी, विठ्ठल कुऱ्हाडकर, प्रसाद जगताप यांचया उपस्थित घेण्यात आली.
महाराष्ट्र सन २०१८ पासुन बंद असलेले शासनमान्य ताडी (शिंदी) दुकाने राज्याचे प्रशासन विभाग पुनश्च चालु करण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून सदर शासन मान्य ताडी (शिंदी) दुकाने सुरु करू नये यासाठी महाराष्ट्र राज्य ताडी (शिंदी) दुकाने विरोधी संघर्ष समितीच्या वतीने विविध अंदोलने हाती घेतले आहेत. त्यामध्ये मा. मुख्यमंत्री यांना निवेदन, जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन, उत्पादन शुल्क अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले. परंतु याबाबत कुठलेही ठोस भुमिका घेतली नाही म्हणून संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाचा एक भाग म्हणून १ डिसेंबर २०२१ रोजी बापूजीनगर येथे साक्षरी मोहिमाचे आयोजन करण्यात आले.
बापुजीनगर येथे साक्षरी अभियान सुरु करण्यात आले. यावेळी संघर्ष समितीचे निमंत्रक श्री. विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी संपुर्ण अभियानाची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केले. आणि नागरीक बंधु – भगिनींनी मोठ्या प्रमाणात आपले साक्षरी करावेत असे अहवान केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल कुऱ्हाडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रसाद जगताप यांनी मानले. सदर साक्षरी अभियान यशस्वी करण्यासाठी प्रशांत जक्का, अनिल दंडगुळे, शुभम कलकेरी, शुभांगी कलकेरी, प्रसाद जगताप आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
साक्षरी अभियांनात मोठ्या संख्येने नागरीक बंधु – भगींनी उपस्थित होते.
===========================
*फोटो मॅटर :- महाराष्ट्रात ताडी (शिंदी) संघर्ष समितीच्या वतीने शासन मान्य ताडी (शिंदी) दुकाने विरोधात साक्षरी अभियान बापुजी नगर येथे घेण्यात आले. सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज), शुभम कलकेरी, अनिल दंडगुळे, विठ्ठल कुऱ्हाडकर, प्रसाद जगताप व नागरीक बंधु – भगिनी दिसत आहेत.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here