

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
1 नोव्हेंबर 2005 रोजी शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीवनाची संध्याकाळ सोनेरी करणारी व्यवस्थाच खंडित करण्यात आली, कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पेंशन वर गदा येऊन मयत होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची राखरांगोळी करणारा शासकीय आदेश बाहेर पडला, कर्मचाऱ्यांची हक्काची 1982 ची जुनी पेंशन योजना बंद झाली,खरं म्हणजे निवृत्तीनंतर च्या जीवनातील सतत सुरु राहणारा झरा म्हणजे पेन्शन ,मृत्यू नंतर पत्नी ची किंवा पती ची काळजी वाहणारी व्यवस्था म्हणजे पेन्शन ,कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातील इतकी महत्वाची गोष्ट हिरावून घेतल्याने न्याय हक्कासाठी एक संघर्ष सुरू झाला, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना गेल्या 6 वर्षांपासून जीवाचे रान करीत आहेत, कित्येक आंदोलने केली, मात्र अद्याप पावेतो कायमस्वरूपी न्याय मिळवून देणारी व्यवस्था मात्र अजूनही अस्तित्वात आली नाहीत, शासनाच्या या अन्याय कारी धोरणाच्या विरोधात आता महाराष्ट्र मधील सर्व विभागाच्या संघटना एकत्रित येऊन पेन्शन संघर्ष समन्वय समिती स्थापन केली असून त्रिस्तरीय आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे,
22 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून पेन्शन संघर्ष यात्रा निघाली आहेत,आझाद मैदान, मुंबई येथून निघालेल्या पेन्शन रथ च्या माध्यमातून जनजागृती करत शासनाचे लक्ष वेध
न्यासाठी 36 जिल्हे पार करीत वर्धा सेवाग्राम येथे पोहचणार आहेत,
6 डिसेंबर ला सकाळी 9,30 वाजता ही पेन्शन संघर्ष यात्रा वरोरा येथे येताच स्वागत करण्यात येणार आहेत, तेथून मोटारसायकल रॅली द्वारे चंद्रपूर येथे 11 वाजता न्यू इंग्लिश ग्राऊंडवर भव्य सभा आयोजित करण्यात आली आहेत,12 वाजता ग्राऊंड वरून जिल्हाधिकारी कार्यालय पावेतो भव्य पेन्शन यात्रा काढण्यात येणार आहेत
या पेन्शन यात्रेत सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हा जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती,ने केले आहेत,