बुटीबोरीतील महिला अमरावतीत मृत आढळून आली दोन मुले झाली अनाथ, समाजमन द्रवले

लोकदर्शन👉

******
🙏मरण फार स्वस्त झालय हो 😢🙏

आज सकाळी ८:३० च्या दरम्यान PSI चव्हान सर गाडगेनगर पोलिसस्टेशन मधून फोन आला. आपन गुंजनताई बोलताय का? PKV कॉलेज वेलकम पॉइंट ला एक बेवारस बाईच प्रेत सापडले आहे, येऊ शकता का तुम्ही? १० मिनीटे मध्ये पोहचते म्हणून मी त्या दिशेने निघाले..
अमरावती मध्ये बेवारस प्रेत/लाश सापडले की पोलिस मला Call करतात व आम्ही अंतिम विधी करतो.. तसाच हा पण फोन असेल असे मला वाटले पण घटनास्थळी पोहचताच माझे हात पाय आज पहिल्यादा ढिले पडले कारणही तसेच होते..
साधारन ३०/३२ वर्षाची बाई समोर मृत होती व तिच्या छातीला बिलगून अंदाजे ९/१० महिन्याची मुलगी जिवाच्या आकांताने रडत होती. हातापायाला काच रुतल्याने जखमा होऊन बाळ प्रचंड अस्वस्थ झाले होते. उजव्या पायाचे फिमर बोन फ्रेॅक्चर होऊन पाय प्रचंड सुजला होता.. अंगावर पांघरुन काहीही नसल्याने रात्रभर त्या जंगली भागात कड़ाक्याच्या थंडीत मेलेल्या आईला उठवन्यासाठी जिवाचा आटापिटा करणार बाळ राहून राहून दचकत होत, आणि गर्दी बघून परत रडत होत.. मी त्याला जवळ घेतले, ते दुधपित बाळ होत. मेलेल्या आईचे स्तन ड्रेस बाहेर काढून ते रात्री पिल होत असे प्रत्यक्ष क्षनी बघितल्यावर आम्ही अंदाज काढला होता.
बाळाला कुशीत घेतल व तिथेच खाली बसून शेकडोच्या गर्दीत त्याच्या तोंडात पटकन स्तन देऊन दुध पाजू लागले व डोळ्यातील पाणी लपवू लागले. माझ्या कुशीत येऊन त्याला नेमक काय वाटले हे माहित नाही त्यानंतर तब्बल ५ तास ते माझ्या कुशीतून बाजूला व्हायला ही तयार नव्हते. त्याला भाऊ ऋषीकेश देशमुख च्या मदतीने परिजात हॉस्पिटल मध्ये नेले. तपासणी करून जखमाना मलम लावून परत पोलिसस्टेशन ला नेले. तेव्हढ्यात तिथे त्याच महिलेचा अंदाजे ४ वर्षाचा मुलगा पण सापडला. पुढील प्रोसेस म्हणून डॉ दिलीप काळे सरांचे मार्गदर्शन घेऊन जिल्हा बाल संरक्षण अधिकारि डबले सरांना Call केला, केअर सेंटरमध्ये नेले, अंघोळ घातलि, जेवू घातले,परत ४:३०वाजता लेडी कॉन्स्टेबल ला घेऊन बाळाला इर्विंन ला नेले डॉ ला विनंती करून x-ray केला. कांस्टेबल ताईने बाळाला प्लॅस्टर लावून परत बाळ केअर सेंटर ला नेले. रात्री ८ वाजता PI चोरमोले साहेबांना भेटून पुढील चौकशि व काही महत्त्वाचे बोलने केले. पत्रकारांचे फोनला प्रतिसाद दिला.
हे सर्व करत अस्ताना कितीतरी वेळा बाळाला माझे दूध पाजले तेव्हा वारंवार एकच विचार येत होता की त्या बाईला नेमक काय एवढं दुःख होत की दुधपित्या लेकराचा विचार येऊ नये?
मोठ्या मुलाच्या चौकशी वरून तिच्या घरचा पत्ता पोलिसाना सापडला, नातेवाईक थोड्या वेळात पोहचतीलही, पण घरातून नवऱ्याशि वाद होऊन चक्क बुटीबोरी एरियातून लेकरांना घेऊन निघालेलि ती बाई अमरावती ला येऊन मरण पावलि आणि लेकरांनाच असे पोरक करून गेली??
त्या बाईला सकाळ पासून मला एवढंच सांगाव वाटते की अग वेडे एकदा आपन आई झाल्यावर आपल्याला अश्याप्रकारे मरायचा अधिकार नसतो ग बाई 😢😢🙏
( बायांनो त्रास सहन होत नाही मान्य, घरी वाद होतात मान्य पण टोकाचा निर्णय नका घेऊ ग. फार वेदनादाई अस्ते हे आपल्या लेकरांसाठी 🙏😢😢 कुठल्याही स्त्रीला काहीही प्रॉब्लेम असूद्या एक मोठी बहीण म्हणून मला हक्काने Call करा मला मी आहे तुमच्या सोबतिला, नसेल त्रास सहन होत, नाही रहायच कुठ तर् हक्काने यां माझ्या कडे, तुम्हाला सुरक्षित ठेवन्याची, तुम्हाला रोजगार देऊन सक्षम करण्याची पूर्ण जबाबदारी माझी ग बायांनो पण असा पळवाट नका काढू ग 🙏🙏😢 आत्महत्या हा पर्याय नसतो ग🙏)

गुंजन गोळे
अमरावती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here