जागतिक संकट स्थिती व शांतीचा मार्ग या पुस्तकाचे प्रकाशन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- २७/११/२०२१ :-* अंतरराष्ट्रीय अहमदीया मुस्लिम जमातीचे वर्तमान जागतिक खलीफा हजरत मिर्जा मसरुर अहमद साहेब यांनी जगातील सर्व धार्मिक मार्गदर्शन तथा सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष याकडे आकर्शित व्हावे म्हणून जागतिक संकट स्थिती व शांतीचा मार्ग या पुस्तकाचे लिखान केले आहे. सदर पुस्तकाचे वितरण महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या हस्ते करण्यात आले. आणि त्यांना श्री. अंसार अली खान यांनी सदर पुस्तक भेट दिली.
या पुस्तकात विशेष करून सद्यस्थितीत जागतिक पातळीवर ज्या अनुचित घटना घडताहेत त्यावरुन असे दिसून येते की संपुर्ण मानव जातीचे अस्तित्व धोक्यात आले की काय ? जिकडे पाहावे तिकडे अन्याय, अत्याचार, व्यभिचांर तथा भ्रष्टाचाराने समाज होरपळला जात आहे.
या संकटातून समाजाला वाचविणे अशा संकटापासून जागरूक करणे हे एका धर्मगुरू किंवा धार्मिक मार्गदर्शकांचे कर्तव्य आहे. आतंरराष्ट्रीय अहमदीया मुस्लिम जमाअतचे वर्तमान जागतिक खलीफा हजरत मिर्जा मसरुर अहमद साहेब यांनी जगातील सर्व धार्मिक मार्गदर्शक तथा राजकीय नेत्यांचे लक्ष याकडे आकर्षित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की जग तीव्र गतीने विनाशाकडे व तीसऱ्या महायुध्दाच्या खाईत खेचला जात आहे. यासर्वांपासुन वाचण्यासाठी सत्याच्या मार्गाचा अवलंब केला गेला पाहिजे.
वाचको ! हजरत मिर्जा मसरुर अहमद साहेब यांनी विश्व शांतीसाठी जे प्रयत्न केले व करताहेत ते धार्मिक इतिहासात अत्यंत मोलाचे योगदान ठरणार. त्यांनी यु.के पार्लमेंट, जर्मनीच्या मिलटरी हेड क्वार्टर, लंडनच्या नवीं पीस सेम्पोजियम तथा वाशिंगटन (अमेरिका) च्या कैपीटलहिल मध्ये आणि युरोपियन पार्लमेंटला सुध्दा विश्व शांतीच्या संदर्भात संबोधित केले आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय राजकीय नेत्यांना विश्व शांतीच्या संदर्भात पत्र सुध्दा पाठविले आहेत, ज्यामध्ये इस्त्राइल देशाचे पंतप्रधान बिन्जामीन नेतन्याहु, इराणचे राष्ट्रपती बराक ओबामा, कॅनडाचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा, कॅनडाचे पंतप्रधान स्टेफन हार्पर, सऊदी अरबचे बादशहा अब्दुल्लाह बिन अब्दुल अजीज अल सऊद, चीनचे राष्ट्रपती एन जियाबाओ, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून, जर्मनीचे चान्सलर एंजीला मरकल, फ्रेंच रिपब्लिकन चे प्रेसिडेंट, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ व्दितीय, इराणचे धार्मिक नेते आततुल्लाह खेमीनी आदिंचा समावेश आहे.
सदर कामगार सेना कार्यालयात पुस्तक भेट समारंभ प्रसंगी प्रसाद जगताप, विठ्ठल कुऱ्हाडकर, संजीव शेट्टी हे उपस्थित होते.
*●◆■★★■◆●●■★★★★★★★★★★★
*फोटो मॅटर :- जागतिक संकट स्थिती व शांतीचा मार्ग हा पुस्तक विष्णु कारमपुरी (महाराज) यांना भेट देतांना अंसारी खान, प्रसाद जगताप, विठ्ठल कुऱ्हाडकर, संजीव शेट्टी आदि दिसत आहेत.*★★★★★★★★★★★★★★★★

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *