26/11 या वीर दिनानिमित्त वीर जवानांना आदरांजली.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- २७/११/२०२१ :-* २६/११ हा दिवस म्हणजे संपूर्ण जगाला काळा दिवस माणला जातो. कारण यादिवशी अतिरेक्यांनी महाराष्ट्राचे राजधानी व जागतिक बाजारपेठेचे मुख्य केंद्र असलेल्या मुंबईत झालेल्या चकमकीत वीर – महावीर असे वीर जवान शहीद झाले. त्या पित्यार्थ दक्षिण सदर बजार लष्कर येथे सामाजिक मंडळाच्या वतीने आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम करण्यात आला.
दक्षिण सदर बजार लष्कर येथे झालेल्या वीर जवानांना आदरांजली कार्यक्रम साजरा करतांना विविध मान्यवरांच्या हस्ते मेणबत्ती लावून आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली.
सदर प्रसंगी नरसिंग म्हैत्रे (व्हि.पी.सिंग), नरसिंग जंगम, नरसिंग आसादे, योगेश पलेल्लू, प्रसाद जगताप व मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*●◆■★★■◆◆◆■★■
*फोटो मॅटर :- दक्षिण सदर बजार लष्कर विभागात वीर शहीद जवाहनांना आदरांजली वाहण्याचे कार्यक्रम करण्यात आली. सदर प्रंसगी विष्णु कारमपुरी (महाराज), नरसिंग आसादे, (व्हि.पी.सिंग), प्रसाद जगताप व नागरीक मोठ्या संख्येने दिसत आहेत.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here