

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात 26 नोव्हेंबरला संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या सभागृहात संविधानच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तसेच याप्रसंगी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक संजय गाडगे, ज्योती चटप, सुरेश पाटील, सुषमा शेंडे, एन.के.बावनकर आदी मंडळी मंचावर उपस्थित होती.
संविधान दिनानिमित्त मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व त्याची आवश्यकता पटवून दिली एवढेच नव्हे तर सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात संविधानातील
मुलतत्वांचा विद्यार्थ्यांनी अंगीकार करावा असे मत व्यक्त केले.तसेच उपस्थित प्रमुख अतिथींनी संविधाना संबंधी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन महेंद्रकुमार ताकसांडे यांनी तर आभार नामदेव बावनकर यांनी मानले कार्यक्रमासाठी सी. जे. घाटे.जी. एन. बोबडे. भालचंद्र कोंगरे, बापूजी मेश्राम, सी.एम.किनाके, बी.एस.मरस्कोल्हे कु. माधुरी उमरे, कु. बी.जे.गोपंमवार, जीवन आडे,सीताराम आत्राम, संकल्प भसारकर,प्रेमचंद आदोळे ,रामदास
वाढई यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी. विद्यार्थी यांनी सहकार्य केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.