शेतकरी आंदोलन यशस्वी झाल्याने शेतकरी नेतेच दुःखी – आमदार सुभाष धोटे

लोकदर्शन 👉 मोहन भरती ।


⭕कोरपना तालुक्यातील तळोधी येथे काँग्रेसचे जनजागरण अभियान.

कोरपना :– चारशे दिवसांपेक्षा अधिक दिवस शेतकऱ्यांनी तीन काळ्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करून कायदे मागे घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडले. मात्र शेतकरी कायदे मागे घेतल्याने शेतकरी नेतेच दुखी झाल्याचे राजुरा विधानसभा क्षेत्रात पाहायला मिळाल्याचे वक्तव्य आमदार सुभाष धोटे यांनी तळोधी येथे घेण्यात आलेल्या जनजागरण मेळाव्यात केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १४ ते २९ नोव्हेंबर या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या वतीने जनजागरण अभियान राबविण्यात येत आहेत. राजुरा विधानसभा क्षेत्रात आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात कोरपना तालुक्यातील तळोधी येथे बुधवार २५ नोव्हेंबरला सायंकाळी गावातील भजनी मंडळी, शेतकरी, शेतमजूर, युवक, युवती, महिला यांच्या समवेत गावात भजन मंडळ, बँड पथकाच्या सहाय्याने रॅली तसेच गावकऱ्यांसमवेत सभा घेऊन जनजागरण करण्यात आले. रात्री भोजनाचा कार्यक्रम आटोपून भजन मंडळाच्या जनप्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, आज देशातील जनता केंद्र सरकार पुरस्कृत पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, खाद्यतेल यासह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या भरमसाठ दरवाढीने आणि भ्रष्टाचार, बेरोजगारी, शोषण यामुळे त्रस्त आहे. याचबरोबर शेतकरी विरोधी तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या इतर अनेक मागण्यांसाठी जवळपास एक वर्षापासून दिल्ली आणि देशात अनेक ठिकाणी लाखो शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यात ७०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. अलीकडे काही राज्यांच्या पोटनिवडणुकीत जनतेने भाजपच्या अनेक उमेदवारांचे पराभव केले. पुढे उत्तर प्रदेश, पंजाब आणि आणखी काही राज्यांमध्ये निवडणूका लक्षात घेता मोदी सरकारने तिन्ही काळे कायदे रद्द केलेत मात्र यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रातील काही शेतकरी नेते, भाजपचे नेते, कार्यकर्ते कमालीचे दुःखी आहेत. देशभरातील शेतकरी आज आनंद साजरा करीत असताना आपल्या भागातील शेतकर्‍यांचे कैवारी असल्याचा आव आणणारे नेते, कार्यकर्ते मात्र अक्षरशः शोक सागरात बुडालेले आहेत. शेतकऱ्यांनी हे सर्व लक्षात घेऊन भाजपबरोबरच या शेतकरी नेत्यांना सुध्दा धडा शिकवा असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी शेतकरी संघटनेचे मधुकर टेकाम, मानिक मुके, सुरेश कोडापे, शिवसेना पक्षाचे एकनाथ राऊत यांनी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला.
या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थिपे, नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी जि. प. सदस्य उत्तम पेचे, सरपंच ज्योती जेणेकर, नगरसेवक विक्रम येरणे, प्रा. आशिष देरकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, राहुल उमरे, उपसरपंच राजेश चतूरकर, गणेश गोडे, सरपंच वरोडा वनमाला कातकर, देवराव ठावरी, सरपंच नौकारी संगीता मडावी, युवक काँग्रेसचे महासचिव विलास मडावी, आगलावे, अशोक मासिरकर, रोशन आस्वले, विलास कोंगरे, सुभाष चौधरी, देवदास नैताम, हरिदास जेणेकर, संजय खेवले, रवींद्र गोहोकार, वैभव गोहोकार, श्यामराव जेणेकर, प्रमोद डाहकी, सुधीर थिपे, किशोर बलकी, एकनाथ गोखरे, दिपक पानघाटे, अनिल आत्राम, गौतम खोब्रागडे, गणेश तुराणकार, सुधाकर ठाकरे, नदंकिशोर बेलोरकर, नंदू तेलंग यासह तळोधी आणि कोरपना तालुक्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे यांनी केले, संचालन सं. गां. नि. यो. अध्यक्ष उमेश राजूरकर यांनी तर आभार प्रदर्शन गणेश गोडे यांनी केले. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *