

लोकदर्शन 👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- १८/११/२०२१ :-* महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन विभागाने महाराष्ट्रात बंद पडलेल्या शासनमान्य ताडी (शिंदी) दुकाने पाम वाईनच्या नावाखाली चालू करण्याचा प्रयत्नात आहेत. सदर ताडी (शिंदी) चालू करण्याचा विरोधात *महाराष्ट्र ताडी (शिंदी) विरोधी संघर्ष समितीच्या वतीने एक लाख सह्यांची स्वाक्षरी मोहिम* राबविण्यात येणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे निमंत्रक विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी प्रसध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
शासनमान्य ताडी (शिंदी) दुकाने सन २०१८ सालापासून बंद आहेत. कारण या शासन मान्य ताडी दुकानात नैसर्गिक ताडी (शिंदी) न विकता केमिकल युक्त विषारी ताडी (शिंदी) विकला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक गोर – गरीब कामगारांचे सदर शासनमान्य ताडी (शिंदी) दुकानातुन ताडी (शिंदी) पुऊन मृत्युमुखी पडले आहेत. आणि त्यांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे. अशा प्रकारे केमिकम युक्त विषारी ताडी (शिंदी) दुकाने बंद करावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व संघटना व कार्यकर्ते आणि लोक प्रतिनिधी आंदोलनाद्वारे मागणी केली आहे. म्हणून त्यावेळी तत्कालीन शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातील शासनमान्य ताडी (शिंदी) दुकाने बंद केले. असे असतांना महाविकास आघाडी सरकारतील प्रशासन परत एकदा ताडी (शिंदी) चालू करण्याचा प्रयत्नात आहेत. असे समजते म्हणून महाराष्ट्र ताडी (शिंदी) विरोधी संघर्ष समिती ताडी (शिंदी) दुकाने परत सुरू करू नये यासाठी मा. मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे विनंती केली आहे. त्याच बरोबर मा. जिल्हाधिकारी सोलापूर, मा. उत्पादक शुल्क अधिकारी सोलापूर यांनाही निवेदन देण्यात आले परंतु सदर मागणी बाबत ठोस असा निर्णय आला नाही म्हणून ताडी (शिंदी) दुकाने सुरू होऊ नये म्हणून महाराष्ट्र ताडी (शिंदी) विरोधी संघर्ष समितीच्या वतीने एक लाख सह्यांची निवेदन मा. मुख्यमंत्री यांना देण्यासाठी दि. २४ नोव्हेंबर २०२१ पासून शहरातील प्रमुख चौकात स्वाक्षरी अभियान राबविण्याचे अभियान सुरू करण्याचा निर्णय संघर्ष समितीच्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आली आहे.
ताडी (शिंदी) विरोधी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत विष्णु कारमपुरी (महाराज), शहानवाज कंपली, अनिल दंडगुले, शिवा ढोकळे, प्रसाद जगताप, गुरूनाथ कोळी, दशरथ नंदाल, विठ्ठल कुऱ्हाडकर, गणेश म्हंता, पप्पु शेख यांची उपस्थिती होती.
*●◆★★★■◆●●◆■★■◆◆●●◆■■*
*फोटो मॅटर :- शासनमान्य ताडी दुकाने सुरु करण्यात येऊ नये यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी निमंत्रक विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहानवाज कंपली, अनिल दंडगुले, शिवा ढोकळे, प्रसाद जगताप, गुरूनाथ कोळी आदि मान्यवर दिसत आहेत.*