

लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕*कातलाबोडी येथे काँग्रेसच्या गाव चलो अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*⭕अनेक युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश*
गडचांदूर –
कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे. केवळ निवडणुकीच्या वेळी नेते गावातील कार्यकर्त्यांना भेटतात. मात्र निवडणूक व्यतिरिक्त सुद्धा कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन समस्या समजून त्या सोडविता याव्या यासाठी गाव चलो अभियानाची सुरुवात करण्यात आल्याचे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे यांनी केले. कातलाबोडी येथे काँग्रेसच्या गाव चलो अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रारंभी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या अभियानाच्या माध्यमातून गावागावात जाऊन काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांशी संवाद साधत आहे. विविध योजनांची माहिती देऊन कार्यकर्त्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून कोरपना पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य शाम रणदिवे, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, ज्येष्ठ नेते सुरेश मालेकर, गाव चलो अभियानाचे समन्वयक आशिष देरकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, गणेश गोडे, युवक काँग्रेसचे विधानसभा महासचिव रोशन आस्वले, युवक काँग्रेसचे विधानसभा महासचिव विलास मडावी, नामदेव जोगी, खंडू उरकुडे, माजी नगरसेवक इस्माईल शेख, अल्पसंख्यांक अध्यक्ष निसार शेख यांच्यासह गावातील शेकडो लोकांची उपस्थिती होती.
यावेळी गावातील अनेक युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.