गोविंद भाऊ गिरी यांच्या पुढाकारातुन अविस्मरणीय सोहळा संपन्न

लोकदर्शन 👉 माहेशजी गिरी

अहमदपूर समाज बांधवाने मनापासून आभार

अहमदपुर /चाकुर समाज बांधवांच्या वतीने नुकताच गोसावी समाज बांधवांचा स्नेहंमेळावा व सत्कार सोहळा मा.सोमनाथ गिरी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता.अतिषय भव्य- दिव्य असा हा कार्यक्रम संपन्न झाला.या मेळाव्याचे मुख्य संयोजक तथा मुक्त पञकार माननीय गोविंद भाऊ गिरी यांनी या कार्यक्रमाचे अतिषय सुंदर नियोजन केले होते.या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी आसाम राज्यातील जिल्हाधिकारी तथा अमदपुर तालुक्याचे भुमिपुञ माननीय नरसिंग पवार साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी निश्चल पुरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा क्रेडाईचे राज्यविस्तारक डाँ धर्मवीर भारती.लातूर जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.दताञ्य गिरी साहेब,देवतद गिरी साहेब यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते हृदयस्पर्शी सन्मान करण्यात आला.या वेळी व्यासपीठावरती.लातूर जिल्हा परिषेदेचे समाज कल्याण सभापती मा.रोहिदास वाघमारे.प्रसिध्द युवा कीर्तनकार अविनाश भारती,परभणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैया भारती,कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा.रमेश भारती.आदर्श शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रविण गिरी.उदगीर रोटरी क्लबचे अध्यक्ष विशाल तोंडचिरकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी अहमदपुर समाज बांधवांच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.विविध मान्यवरांची या प्रसंगी आपली मनोगते व्यक्त केली.अहमदपुर येथे दफनभुमी मिळवण्यासाठी महत्वाची भुमिका पारपडल्या बदल मान्यवरांच्या हस्ते गोविंद भाऊ गिरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.सदरील मेळाव्यास समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या मेळाव्यास आम्हाला निमंञीत करुन आमचा मानसन्मान केला त्या बदल अहमदपुर समाज बांधवांचे व विशेष करुन गोविंद भाऊ गिरी आणि सोमनाथ भाऊ गिरी यांचे विशेष आभार.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *