ऐन दिवाळीच्या दिवशी आशीष सोनपितरे या विद्यार्थ्यांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू।                                         

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, सोनूर्ली येथील लिपिक वामनराव सोनपितरे यांचा मुलगा आशीष (23)याचा ऐन दिवाळी च्या दिवशी वडगाव येथे स्वतःच्या शेतातील बंधाऱ्यातिल गाळात पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे सोनपितरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे,
आशिष हा महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयचा माजी विद्यार्थी असून त्याने नुकताच चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात एम,एस, सी,(फिजीक्स)प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता,
4 नोव्हेंबर ला दुपारी 1 च्या दरम्यान शेतातील बंधाऱ्याच्या पाण्यात पाइप दुरुस्ती करताना पाय घसरला व पाण्यातील गाळात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला,ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे शवविच्छेदन केल्यानंतर रात्री वडगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले,त्याच्या पश्चात आई,वडील, बहीण, काका,काकू,तथा बराच मोठा आप्तपरिवार आहेत,
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ चे संचालक रामचंद्र सोनपितरे यांचा तो पुतण्या होता,
आशिष च्या अकाली मृत्यू मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here