गडचांदूर पोस्ट ऑफिसमध्ये केवळ पोस्टमास्तर कार्यरत ग्राहक त्रस्त पार्सल ची कामे ठप्प

By : Mohan Bharti

गडचांदूर : पोस्ट ऑफिस गडचांदूर मध्ये केवळ पोस्टमास्तर कार्यरत असल्याने ग्राहकांना अतोनात त्रास होत आहेत, संपूर्ण पोस्टाचा डोलारा त्यांच्यावर असल्याने पोस्टात येणाऱ्या ग्राहकांची कामे खोळंबली आहेत, पोस्टात केवळ पैसे जमा करणे व पैसे परत करणे एवढीच कामे होत आहेत. पार्सल करणाऱ्या ग्राहकांना परत करीत आहेत. पोस्ट ऑफिस मध्ये असणारी रिक्त पदे न भरल्या ने तसेच कर्मचारी सुट्टी वर असल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे पोस्टमास्तर यांनी सांगितले,
चंद्रपूर येथील मुख्य पोस्ट ऑफिस मधील वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांचेशी संपर्क साधला असता त्यांना रिक्त पदे न भरली असल्याने व दीपावलीनिमित्ताने कर्मचारी सुट्टी वर गेल्याने ग्राहकांना त्रास होत आहेत याला नाईलाज असल्याचे सांगितले,
पोस्ट ऑफिस मध्ये कर्मचारी जोपर्यंत येणार नाहीत तोपर्यंत पार्सल ची कामे होणार नाहीत असे सांगून ग्राहकांना परत पाठवीत आहेत, विनाकारण ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी ग्राहकांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here