राजुऱ्यात काँग्रेस सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात. आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते शुभारंभ.

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– १ नोव्हेंबर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस द्वारा आयोजित काँग्रेस सभासद नोंदणी अभियानाला काँग्रेस कमेटीचे कार्यालय, गांधी भवन, राजुरा येथे सुरुवात करण्यात आली. राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा तथा नगरसेविका संध्या चांदेकर यांना प्रथम सदस्यता नोंदणी बहाल करण्यात आली. यानंतर अनेकांना सदस्यत्व देण्यात येत आहे. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी काँग्रेस पक्षाच्या या सदस्यता अभियानाच्या माध्यमातून पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी क्षेत्रातील महिला, युवक वर्ग यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार असून या सर्व सदस्यांची भुमिका पक्षाची ताकद वाढविण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी काँग्रेसच्या विविध शाखेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावेत आणि क्षेत्रातील जनतेने सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ नेते दादा पाटील लांडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला शहराध्यक्षा सौ संध्या चांदेकर, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, सेवादलचे अध्यक्ष दिनकर कर्णेवार, अशोक देशपांडे, अब्दुल गणी अब्दुल हमिद, ॲड सदानंद लांडे, बांधकाम सभापती हरजीत सिंग संधू, नगरसेवक गजानन भटारकर, दिपा करमनकर, गीता रोहणे, साधना भाके, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, सकावत अली, पंढरी चंन्ने, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, सुमित्रा कुचनकर, पुनम गिरसावळे, योगिता मटाले, रेखा बोढे, प्रणय लांडे, आकाश मावलीकर, उमेश गोनेलवार यासह काँग्रेसच्या विविध शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमी नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *