वरोरा – भद्रावती मतदारसंघातील एकही गाव अंतर्गत रस्त्यांशिवाय राहणार नाही

By👉Shivaji Selokar

मतदारसंघाचा चौफेर विकास करण्यास कटिबद्ध

पायाभूत सुविधा, शासकीय निवास्थान, पशुवैद्यकीय रुग्णालय कामांच्या समावेश

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते १५ कोटी ७९ लक्ष ३७ हजारांच्या ३१ कामांचे भूमिपूजन

चंद्रपूर : वरोरा – भद्रावती मतदार संघाची लोकप्रतिनिधी या नात्याने वरोरा – भद्रावती तालुक्यातील एकही गाव अंतर्गत रस्त्यांशिवाय राहणार नाही, गावातील १०० टक्के अंतर्गत रस्ते येत्या काळात करून या मतदारसंघाचा चौफेर विकास करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिली.

त्या वरोरा – भद्रावती मतदार संघातील १५ कोटी ७९ लक्ष ३७ हजारांच्या ३१ कामांचे भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या. यावेळी मतदारसंघातील अंतर्गत रस्ते व इतर पायाभूत सुविधांचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी भद्रावती नगर परिषदेचे अध्यक्ष अनिल धानोरकर, उपविभागीय अधिकारी बावनकुळे, सहायक अभियंता मत्ते, सायली कदम, मयुरी दोहतरे, प्रमोद मगरे, बसंत सिंग, प्रशांत काळे, सुधीर मुळेवार, भोजराज झाडे, चंदू दानव, प्रदीप घागी, बाळू चिचोळकर, सूरज गावडे, सुधाकर रोहणकर, भानुदास ढवस, नयन जांभुळे यांची उपस्थिती होती.

यामध्ये ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते तसेच भद्रावती येथील शासकीय कर्मचाऱ्यांकरिता निवासस्थानाचे बांधकाम करणे त्याकरिता चार कोटी ६१ लक्ष तसेच भद्रावती येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करण्याकरिता चार कोटी पाच लक्ष ३७ हजार इत्यादी १५ कोटी ७९ लक्ष ३७ हजारांच्या ३१ कामे खनिज विकास निधी अंतर्गत खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्यानुसार मंजूर करण्यात आली. यामुळे या क्षेत्राचा विकासात भर पडली आहे. या सर्व पायाभूत सुविधेच्या माध्यमातून मतदार संघातील चेहरा मोहरा बदलण्यात येणार आहे. अशाच प्रकारचा विकास येत्या काळात देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येणार असल्याची ग्वाही आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *