

लोकदर्शन/ मोहन भारती | गडचांदूर
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिताली सेठी पर्यावरण प्रेमी असून जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खाजगी शाळा, जिल्हा परिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालयात व व्हरांड्यात प्रत्येक कर्मचाऱ्यांनी, स्व इच्छेनुसार कुंडीतील शोभिवंत झाड,लावून कार्यालय, व परिसर सुभोशीत करण्याची सूचना केली, हा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळेत राबविण्याच्या दृष्टीने शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी प्रत्येक शाळेत हा उपक्रम राबविण्याची सूचनावजा विनंती केली होती, त्या अनुषंगाने
जिल्ह्यातील नामवंत असलेल्या महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय ,गडचांदूर च्या कर्तव्यदक्ष प्राचार्य सौ,स्मिताताई चिताडे यांनी हा अभिनव उपक्रम तातडीने यशस्वी रीतीने राबविला,कार्यालयात व परिसरात शोभिवंत झाडांच्या कुंड्या ठेवून परिसर सुभोशीत केला, यासाठी शिक्षक, शिक्षिका, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे महत्त्व पूर्ण योगदान लाभले,कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कुंड्या मध्ये विविध प्रकारच्या शोभिवंत झाडांची व फुलझाडे लावून परिसर शोभावंत केला,याप्रसंगी प्राचार्या स्मिताताई चिताडे,संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,एम,सी,व्ही, सी,विभागाचे प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे, तथा इतर प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,