त्या आदिवासी युवकाचा मृत्यू रेल्वे पोलिसांच्या मारहाणीमुळेच – हंसराज अहीर या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी

By : Shivaji Selokar

चंद्रपूरः– राजुरा तालुक्यातील विरूर (स्टे) येथील संशयीत आरोपी म्हणून रेल्वे पोलीसांनी अटक केलेल्या अनिल गणपत मडावी या आदिवासी युवकाचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळेच झाल्याचा गंभीर आरोप पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय सखोल चैकशी करावी व दोषींवर खुनाचा गुन्हा दर्ज करावा अशी मागणी त्यांनी रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे केली.
रेल्वे पोलिसांनी परवा आदिवासी समाजातील या युवकाला संशयीत म्हणून ताब्यात घेतले होते व बल्लारशा येथील कस्टडीत ठेवले. सदर बाब विरूर स्टे. येथील ग्रामस्थ व कुटूंबियांना ठावूक होती. परंतू दि. 13 जुलै रोजी मृतकाच्या आईला दुरध्वणीवरून त्यांच्या मुलाच्या मृत्युची बातमी देण्यात आली व त्याचे पार्थिव घरी घेऊन जाण्याचा रेल्वे पोलिसांनी निरोप दिला. केवळ दिखावा म्हणून मृतकास बल्लारपूर ग्रामिण रूग्णलयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. सदर युवकाचा मृत्यू हा फीट आल्याने झाल्याचा बनाव रेल्वे पोलिसांनी केला असला तरी मृतकाच्या आईच्या म्हणन्यानुसार त्याला फीट किंवा अन्य कोणताही आजार नव्हता त्यामुळे हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला असल्याचे दोषी रेल्वे पोलिसांवर एफआयआर दाखल करावा असे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी फार मोठा अपराध केला असल्याने या प्रकरणाची निष्पक्षपणे सखोल चैकशी करावी तसेच शवविच्छेदन डाॅक्टर्स पॅनलच्या उपस्थितीमध्येच व्हावे अशी मागणी केली. या प्रकरणातून पूढे अनेक बाबी समोर येण्याची शक्यता असल्याने मृतकाचा दफनविधी करावा अशी मागणीही केली. अपराधी कोणीही असो त्याला वाचविण्याचा प्रयत्न होता कामा नये. रेल्वेच्या वरीष्ठांनी विभागाची बदनामी होवू नये याची दक्षता घ्यावी असेही अहीर यांनी माध्यमाशी बोलतांना सांगीतले. दरम्यान मृतकाच्या आईने आदिवासी बांधवांसोबत येऊन हंसराज अहीर यांची भेट घेतली व त्यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *