कोरपना येते ठाकरे सरकार विरोधात जाहीर निषेध आंदोलन व पुतळा दहन कार्यक्रम


लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
⭕महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात

⭕श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष

⭕ ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत बुलंद आवाज उठवणाऱ्या बारा आमदारांना निलंबित करून महाराष्ट्र शासनाने लोकशाहीची हत्या केली आहे महाराष्ट्र सरकारचे हे धोरण दडपशाहीचे असून केवळ दोनच दिवसाचे अधिवेशन बोलावण्यात आले त्यातही विरोधकांना बोलू न देणे हे हुकूमशाहीचे धोरण असून हा लोकशाहीचा अपमान आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतोमहाराष्ट्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून पुतळा दहन करण्यात आला श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात हे आंदोलन घेण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती श्री सतीशजी उपलचिंवार शहराध्यक्ष गडचांदूर, विशाल गज्जलवार,अरुण भाऊ मडावी सरपंच,संजय भाऊ मुसळे माजी संजय गांधी निराधार अध्यक्ष, नूतन कुमार जीवने पंचायत समिती सदस्य,अरुण भाऊ डोहे नगर सेवक गडचांदूर, श्री रामसेवक मोरे नगरसेवक गडचांदूर,अमोलजी आसेकर नगरसेवक कोरपना, ओम पवार युवा मोर्चा जिल्हा सचिव,ऍड पवन मोहितकर, अनिल कवरासे शाखा अध्यक्ष कोरपना,शशिकांत अडकिने माजी सरपंच,हरिभाऊ घोरे शहर महामंत्री गडचांदूर,संदीपजी शेरखी गडचांदूर, दिनेश खडसे युवा मोर्चा कार्यकर्ते, कार्तिक गोंडलावार युवा मोर्चा कार्यकर्ते, प्रमोदजी पायगन, मनोज तुमराम, साजिद उंमरे युवा मोर्चा कार्यकर्ते,अभय डोहे, हरबाजी झाडे, पद्माकर मडावी आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते तालुकाध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात ओबीसीच राजकीय आरक्षण आता धोक्यात आल आहे ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद या सारख्या स्थानिक स्वराज्य संस्था मधील आरक्षण संपुष्टात आलं महाराष्ट्रात ओबीसींना 27 टक्के आरक्षण कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुकीत देता येणार नाही महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात नीट बाजू मांडली नाही व कोणताही पाठपुरावा केला नाही करिता ओबीसीच राजकीय आरक्षण रद्द झाल आम्ही महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करतो व ओबीसीचे बारा आमदार यांचे निलंबन मागे घ्यावे ओबीसीला आरक्षण त्वरित लागू कराव अशी मागणी करतो अन्यथा यापुढे मोठ आंदोलन छेडू असा इशारा दिला इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलेयावेळी मा श्री राज्यपालांना तहसीलदार कोरपना यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन ओम पवार यांनी केले तर आभार ऍड पवन मोहितकर यांनी मानले

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *