माढेळी प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर व MBBS डॉक्टर उपलब्ध*

 

●*हंसराज अहीर यांचे माढेळी ग्रामवासियांनी मानले आभार*
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
माढेळी ता वरोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. कोरोना संकटकाळात तिथे विलगीकरण केंद्र सुद्धा स्थापन करण्यात आले आहे. कोरोना संकट काळात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा हंसराज जी अहीर यांनी सोयी सुविधा चौकशीसाठी आले असता तेथे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर व MBBS डॉक्टर मिळावा अशा आशयाचे निवेदन माढेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली.
कोरोना संकटात आरोग्य सेवा हे प्रथम प्राधान्य आहे व या सेवेसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध होणे व करून देणे हे आपले आद्य कर्तव्य समजून हंसराज अहीर यांनी माढेळी ग्रामस्थांच्या निवेदनाची तात्काळ दाखल घेत संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून माढेळी प्राथमिक आरोह्या केंद्राला ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर व MBBS डॉक्टर उपलब्ध करून दिला. याबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून सरपंच ग्रा प माढेळी श्री देवानद महाजन व समस्त पदाधिकारी व गावकारी यांनी श्री हंसराज अहिर यांचे आभार मानून धन्यवाद दिले.
यावेळी सभापती श्री राजु गायकवाड भाजपा नेते श्री बाबा बागडे, श्री शेखर चौधरी, सुनील देवतळे सरपंच श्री देवानदजी महाजन सदस्य राजेंद्र सवाई, स्वप्नील वाळके, अमोल काटकर व समस्त भाजपा पदाधिकारी श्री सुनील वारेकर, सोनु दरवरे, प्रदीप देवतळे, अतुल वारेकर यांची उपस्थिती होती.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *