व्हेंटिलेटर, एनआयव्ही, ऑक्सिजन कॉन्‍स्‍ट्रेटर, रुग्णवाहिका आदी उपकरणे पुरविण्यावर आमचा भर – आ. सुधीर मुनगंटीवार


लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*●आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 30 ऑक्सिजन कॉन्‍स्‍ट्रेटरचे वितरण*

*●आतापर्यंत 97 ऑक्सिजन कॉन्‍स्‍ट्रेटर केले उपलब्ध*

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन जे प्रयत्न करत आहे, त्या प्रयत्नांना आमच्या सहकार्याचे बळ आपल्या परीने आम्ही देत आहोत. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा हा या प्रक्रियेत महत्वाचा विषय झाला आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर, एनआयव्ही, ऑक्सिजन कॉन्‍स्‍ट्रेटर, रुग्णवाहिका  आदी उपकरणे पुरविण्यावर आम्ही भर देत आहोत. या प्रक्रियेत Cll फाउंडेशनने सीएसआर च्या माध्यमातून 30 ऑक्सिजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्ध केले आणि यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता  सोसायटी, कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग यांनी सहकार्य केले यासाठी आपण त्यांचे आभारी आहोत अशी भावना विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

Cll फाउंडेशनच्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग यांच्या सहकार्याने माजी अर्थमंत्री आ .सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 30 ऑक्सिजन कॉन्‍स्‍ट्रेटर चे वितरण 29 मे रोजी करण्यात आले. राजुरा येथे 5 , भद्रावती येथे 5 , गोंडपिपरी येथे 5 , वरोरा येथे 5 , घुग्गुस येथे 5 तसेच मूल तालुक्यातील चिरोली व मारोडा प्रा. आ.केंद्राना 5 ऑक्सिजन कॉन्‍स्‍ट्रेटर ३० मे रोजी वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 30 मे रोजी पंतप्रधान नरेंद्रभाई  मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण होत आहे, त्या निमित्ताने हे ऑक्सिजन कॉन्‍स्‍ट्रेटर वितरित करण्यात येणार आहे असेही आ मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा उपाध्‍यक्ष डॉ. भगवान गायकवाड, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते बाबा भागडे, जि.प. बांधकाम सभापती राजू गायकवाड, जि.प. कृषी सभापती सुनिल उरकुडे, युवा मोर्चा महामंत्री विवेक बोढे, पंचायत समिती सभापती चंदू मारगोनवार, पंचायत समिती सभापती प्रविण ढेंगणे, नरेंद्र जिवतोडे, जि.प. सदस्‍य यशवंत वाघ, विनोद चौधरी, निरीक्षण तांड्रा, हेमंत उरकुडे, साजन गोहेणे, वामन तुराणकर, सचिन शेंडे, बबन निकोडे, साईनाथ मास्‍टे, भानेश यग्‍गेवार, मुल येथील तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सुमेश खोब्रागडे आदींची उपस्थिती होती. आतापर्यंत आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने  97 ऑक्सिजनकॉन्‍स्‍ट्रेटर चंद्रपूर, मूल, पोंभुर्णा, बल्लारपूर, दुर्गापूर, घुग्गुस, मानोरा, नकोडा, पांढरकवडा, ताडाळी, वरोरा, गडचांदूर, जिवती, डॉ हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर यांना वितरीत करण्यात आले आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *