

लोकदर्शन 👉,मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
●3 सदस्यांचे 2 हप्ते गायब
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
●1वर्षा चे व्याजाचा विनाकारण भुर्दंड
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
●कारवाईची मागणी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,,
जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था गडचांदूर येथे मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरु असून 3 सदस्यांचे कर्ज व आर,डी,चे 2 महिन्याचे हप्ते भरलेच नसल्याचे स्पष्ट झाले आहे, पतसंस्था च्या गलथान कारभाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी याच पतसंस्था चे माजी अध्यक्ष, तथा पंचायत समिती, ब्रम्हपुरी अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक मोरेश्वर बोन्डे यांनी केली आहेत,
सविस्तर वृत्त असे की,या पतसंस्था चे सदस्य श्री मोरेश्वर बोन्डे, राजू तुमराम, ए, बी,वैद्य, पंचायत समिती, ब्रम्हपुरी अंतर्गत कार्यरत आहेत, या कर्मचाऱ्यांचे कर्ज व आर,डी,कपातीचे हप्ते नियमितपणे संवर्ग विकास अधिकारी ,ब्रम्हपुरी पाठवीत आहेत, मात्र येथील पतसंस्था मध्ये आलेले डी,डी,बँकेत पाठवत नसल्याचे दिसून आले आहेत,
श्री मोरेश्वर बोन्डे यांनी पतसंस्था मध्ये आर,डी,चे विवरण मागितले असता त्यात जानेवारी 2020 व जुलै 2020चे हप्ते दिसून आले नाही, याबाबत त्यानी अधिक चौकशी केली असता दोन्ही महिन्याचे डी,डी,कपाटात आढळून आले, आता ते दोन्ही डी,डी,दुरुस्ती साठी पतसंस्था ने पंचायत समिती, ब्रम्हपुरी यांच्याकडे पाठविले आहेत,
जवळपास 1 वर्षे चे व्याजचा भुर्दंड विनाकारण सदस्यांना भरावा लागत आहेत याला जबाबदार कोण, अशी विचारणा केली जात आहेत,
पतसंस्था च्या कपाटात पुन्हा 10 ते 12 डी,डी, बाहेरील पंचायत समितीचे दिसून आल्याचे बोन्डे, यांनी सांगितले,
कर्जाचे हप्ते न भरण्याचा प्रकार अन्य सदस्यांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतो, पतसंस्था च्या भोंगळ कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी उपनिबंधक, कोरपना यांच्या कडे केली ,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कर्ज व आर,डी,रक्कम(2 हप्ते) थकीत असलेले सदस्य,,
1,श्री,राजू तुमराम,,28040 रुपये
2,श्री, मोरेश्वर बोन्डे,,12,020 रुपये
3,श्री, ए, बी,वैद्य,,11040 रुपये
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
एकूण,,51,100 रुपये
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
,,फोटो,,