वरोरा व भद्रावती येथील कोविड हेल्थ सेंटरला हंसराज अहीर यांचे उपस्थितीत करण संजय देवतळे यांचे हस्ते आॅक्सीजन काॅन्सनट्रेटर भेट दिले.


By ÷Shivaji selokar
चंद्रपूरः- जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असतांना रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्या, आॅक्सीजन ची कमतरता पडू नये यासाठी सतत जनसेवेत कार्यरत असलेले पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे माध्यमातून वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय व भद्रावती येथील श्री जैन पाश्र्वनाथ मंदिर येथील कोविड हेल्थ सेंटरला आॅक्सीजन काॅन्सनट्रेटर भेट देण्यात आले.
भाजपा कडुन वरोरा येथे हंसराज अहीर यांचे प्रमुख उपस्थितीत पूर्व पालकमंत्री स्व. संजय देवतळे यांचे पुत्र श्री करण संजय देवतळे, स्व. रवि कष्टी यांचे पुत्र रोहीत रविंद्र कष्टी यांचे हस्ते तर भद्रावती येथे चंदनखेडा येथील सामजिक कार्यकर्ते स्व. निळकंठ सोनकुसरे गुरुजी यांच्या पत्नी श्रीमती नंदाताई सोनकुसरे व मुलगी सौ. पल्लवी केदार(सोनकुसरे) यांचे हस्ते आॅक्सीजन काॅन्सनट्रेटर कोविड केअर सेंटर ला भेट देण्यात आले व असे सेवाकार्य सतत सुरू इेवण्यात येईल असे अहीर यांनी सांगीतले.
दुदैवाने आमचे सहकारी पूर्व पालकमंत्री संजय देवतळे व प्रमुख कार्यकर्ते रविंद्र कष्टी, सुनील पाटील, मिलमीले, श्रीपाद पाटील, चंदनखेड्याचे निळकंठ सोनकुसरे गुरूजी यांचे कोविड संक्रमनात दुःखद निधन झाले अशा दुदैवी घटना कोनाच्या कुटूंबात होवू नये. या आजारावर काम करतांना फक्त सरकारी यंत्रणेवर अवलंबुन न राहता सर्वांनी हातभार लावने आवश्यक आहे. पक्षाकडुन हे आॅक्सीजन काॅन्सनट्रेटर भेट देवून रूग्ण सेवेत सहकार्य होईल, मृत्युदर कमी होईल याच भावनेतून हे भेट देत आहोत.
वरोरा येथे कोविड काळात खाजगी वैद्यकिय सेवा देणारे डाॅ. विवेक तेला व डाॅ. हेमंत खापणे यांचे कोविड सेंटर ला भेट दिली. कोरोना रुग्णांना अविरत सेवा देणाÚया डाॅ. विवेक तेला व डाॅ. हेमंत खापणे यांचा अहीर यांनी सन्मान केला
यावेळी खुशाल बोंडे, वरोरा नगराध्यक्ष अहेतेशाम अली, भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. भगवान गायकवाड, ज्येष्ठ नेते बाबा भागडे, ओम मांडवकर, सुरेश महाजन, विनोद लोहकरे, राजेश साकुरे, प्रकाश दुर्गपुरोहित, मधुकर ठाकरे, महेश श्रीरंग, भारत तेला, बाळू भोयर, सुनिल समर्थ, अभिजित गहनेवार, अमित आसेकर, जगदिश तोटावार, प्रतिक काळे, विजय वानखेडे, सुनिल नामोजवार, प्रविण सातपूते, किशोर गोवारदिपे, प्रशांत डाखरे, गोपाल गोसवाडे, इम्रान खान, केतन शिंदे,माधव बांगडे, निशांत देवगडे, गोविंदा बिंजवे, डेविड बागेसर, अमित गुंडावार उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *