वरोडा येथे विद्यार्थीनिनी सादर केले धान लागवडीचे प्रात्यक्षिक

लोकदर्शन  👉 मोहन भारती

रजुरा ÷
डॉ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत येणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील हिराटोला येथील कृषी महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु,निकिता सुदर्शन गाडगे हिने राजुरा तालुक्यातील वरोडा येथील शेतशिवारात धान लागवडीचे प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले,
बी,एस, सी,(कृषी)चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यानी वरोडा येथील प्रगतशील शेतकरी रविंद्र विठोबा गाडगे ,अशोकराव पोडे,गजानन देठे,यांच्या शेतात लागवडीचे प्रात्यक्षिक केले,तसेच धान लागवडीचे फायदे,खताची मात्रा, रोग व कीड व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले,
या अभ्यासक्रमाअंतर्गत त्याना प्राचार्य डॉ,व्ही, एल, बडवाईक,पी,एस, चोपकर,ए, आर,दमाहे यांनी मार्गदर्शन केले,
याप्रसंगी विद्यार्थी, तथा शेतकरी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here