नागपूर येथुन भटके विमुक्त हक्क परिषदेतर्फे भटके विमुक्त व ओबीसी आरक्षण बचाव व जनजागृती मोहिमेस सुरुवात

लोकदर्शन 👉 महेश गिरी नागपुर


*भटके विमुक्त हक्क परिषद, महाराष्ट्र तर्फे ओबीसी कल्याण मंत्री मा ना विजय वडेट्टीवार व मा.श्री बबनराव तायवाडे,अध्यक्ष महाज्योती यांच्या शुभ हस्ते आरक्षण जनजागृती मोहिमेस सुरुवात करण्यात आली*

ओबीसी भटके विमुक्त समाजाच्या प्रलंबित प्रश्नांचा जागर करण्याच्या हेतूने समाजातील मान्यवरांची मते जाणून घेण्यासाठी ,चळवळीची व्यापकता वाढवण्याच्या हेतूने संघटनात्मक बांधणी करण्यासाठी भटके-विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र तर्फे राज्यभर ओबीसी भटके विमुक्त आरक्षण जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.पहिल्या आरक्षण मोहिमेचे उद्घाटन सोमवार दि १६/०८/२०२१ रोजी अध्यापक भवन, गणेश पेठ, नागपुर येथे सकाळी 11.30 वा. भटके विमुक्त हक्क परिषदेचे प्रदेश अध्यक्ष मा श्री धनंजय ओंबसे प्रदेश सचिव प्रा श्री सखाराम धुमाळ व हक्क परिषदेचे प्रदेश मुख्य संघटक श्री पुरुषोत्तम काळे उद्योग आघाडी अध्यक्ष श्री नंदकुमार गोसावी, कर्मचारी आघाडी अध्यक्ष श्री कृष्णात जाधव युवा आघाडी अध्यक्ष श्री प्रतीक गोसावी ,संघटक श्री भीमराव इंगोले,अशोक इंगोले आदी मान्यवर यांचे शुभ हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाची प्रस्तावना हक्क परिषदेचे विदर्भ विभाग अध्यक्ष श्री महेश गिरी सर यांनी केले. मोहीमेचे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा, कोकण विभागात आयोजन करण्यात आले असून उत्तर महाराष्ट्रात या मोहिमेचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती भटके-विमुक्त हक्क परिषदेचे प्रदेश सरचिटणीस प्रा सखाराम धुमाळ यांनी दिली.या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी समस्त ओबीसी व भटके विमुक्त समाजाचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही मा ओबीसी कल्याण मंत्री मा ना श्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.महाज्योतीच्या माध्यमातून भटके विमुक्त व ओबीसी समाजातील विद्यार्थी ,संशोधनक( PHD Aspirants ),विविध स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे युवक यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत कशा पद्धतीने करू शकतो याची माहिती महाज्योती चे अध्यक्ष माननीय श्री बबनराव तायवाडे यांनी याप्रसंगी दिली. तसेच या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना मार्गदर्शन करताना मार्गदर्शन करताना श्री धनंजय ओंबासे यांनी सांगितले की 15 जुलै मंत्रालयातील शासकीय बैठकीला अनुसरून भटके विमुक्तांचे सर्वेक्षण व जातीच्या दाखल्यासाठी 2008 च्या जीआर चे पुनर्जीवन करण्यात यावे तसेच जातीनिहाय जनगणना होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विधिमंडळत ठराव संमत करून केंद्र सरकारला पाठवावा आणी जात निहाय जनगणनेची मागणी करावी असे मत व्यक्त केले. तसेच प्रदेश मुख्य संघटक श्री पुरुषोत्तम काळे सर यांनी संघटनेचे महत्व व कार्यकर्त्यांच्या अंगी कोणते गुण असवेत व संघटनेचा कार्यकर्ता कसा असावा याबद्दल मार्गदर्शन केले तसेच उद्योग आघाडीचे अध्यक्ष यांनी भटके विमुक्त समाजातील जास्तीत जास्त लोकांनी छोटे छोटे उद्योग सुरू करून स्वतःलाही मोठे व्हावे व समाजासही सहकार्य करावे असे मत व्यक्त केले. तसेच शिक्षण व कर्मचारी आघाडीचे अध्यक्ष श्री कृष्णात जाधव सर यांनी आपले विचार मांडताना शिक्षणाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागद पूर्तता कसी करावी याची सविस्तर माहिती दिली.तसेच युवा आघाडीचे अध्यक्ष श्री प्रतीक गोसावी यांनी जास्तीत जास्त युवकांनी हक्क परीक्षेच्या युवा आघाडीती सहभागी होऊन समाजाच्या प्रश्नासाठी लढावे असे आवाहन केले .कार्यक्रमात भटके-विमुक्त हक्क परिषदेच्या विदर्भ विभागाची संघटनात्मक बांधणी करून श्री दयालनाथ नानवटकर ,श्री विजय आगरकर,श्री प्रदिपजी पुरी ,गोवधन बडगे,यशवंत कातरे, अमोल राठोड,विनोद पाचंगे, विनोद इगवे,विजय साळवे, मल्लनाजी बुरमवार,महेश खानेकर,मोहनजी भारती, प्रकाशजी बमनोटे,राजेंद्रजी कडसाईत,गणेश सुरजोशी,विशाल घुगे,दशरथ इंगोले,उमराव मांढरे,महेश डी.गिरी,नितेश पुरी,दिनेश राठोड,बमनोटे सर,सुनिता मोहनकर,कैलास पेंढारकर,वसंतराव कुरई,विशाल गिरी,पंकज राठोड, नागपूर, गडचिरोली,गोंदिया,भंडारा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ,बुलढाणा, वर्धा, गडचिरोली इ. जिल्यातील पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रे देऊन कामाचे आणि जबाबदारीचे वाटप मा अध्यक्ष श्री धनंजय ओंबसे यांचे शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भटके-विमुक्त ,ओबीसी समाजातील बहादूर जाधव, राखी गिरी, प्रविण पुरी, पल्लवी चन्नेकर, पुजा गोवधन, ललीता यादव, प्रज्वल मनहोरे, सिताराम राठोड, धमेंद्रजी जाधव, प्रदिप गोंढाणे,कोविड योध्दा यांचा प्रशस्तीपत्र देऊन बहुमान करण्यात आला.व भटके विमुक्त समाजातील लोक कलावंतांचा त्यांच्या कलासादारीकरणाबद्दल प्रमाण पत्रे देऊन सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागपुर संयोजन समितीचे पदाधिकारी श्री महेश गिरी(विदर्भ विभाग अध्यक्ष)तसेच श्री विजय आगरकर, श्री नितेश पुरी, दिनेश राठोड, गोवर्धन बडगे,दयालनाथ नानवटकर, प्रदीप पाचंगे,प्रदीप पुरी यांनी खुप परिश्रम घेतले.
या प्रसंगी काही समाजातील मान्यवर श्री मधुकरजी गोस्वामी, दिनानाथ वाघमारे डाॅ. राजाभाऊ गोसावी, खिमेश बढीये सर, नामा जाधव, मुकुंद अडेवार, विकास पुरी, राजेंद्र गिरी, सुधाकर वाघडकर, रामसेवक मोरे, शंकर रुजाजी शिंपिकर, लोणारे साहेब, यशवंत कातरे, जावेद मदारी, विजय रामु गिरी, नंदकीशोरजी गोसावी, प्रकाश जाधव, अंकुश माफुर, विनोद दाढे, अंकित पवार उपस्थित होते तसेच समस्त सरोदी,गोसावी,गोंधळी, बंजारा,वंजारी,घिसाडी, मदारी, नाथजोगी, डवरी गोसावी, गवळी, भोई, गोपाळ,धनगर, गोलकर,बेलदार, तिरमल, कहार, इ. भटके विमुक्त समाजाचे मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
———

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *