Home
Home राजुरा राजुरामध्ये जल्लोषात अरुण धोटे यांचा नगराध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा

राजुरामध्ये जल्लोषात अरुण धोटे यांचा नगराध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा

लोकदर्शन राजुरा 👉मोहन भारती

राजुरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी नवनिर्वाचित अरुणभाऊ धोटे यांनी नगर परिषद सभागृह, राजुरा येथे आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. उत्साह, जल्लोष आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडलेला हा पदग्रहण सोहळा राजुरा शहराच्या राजकीय व विकासात्मक दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.

या गौरवपूर्ण प्रसंगी नगरविकास आघाडीचे शिल्पकार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप, तसेच नगरविकास आघाडीतील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीने या सोहळ्याचे औचित्य अधिकच वाढले.

पदग्रहण सोहळ्यापूर्वी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे व निवडक कार्यकर्त्यांसह राजुराचे आराध्य दैवत भवानी माता मंदिर येथे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

या कार्यक्रमास मुख्याधिकारी विवेक चौधरी, काँग्रेस तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष ॲड. दीपक चटप, तालुकाध्यक्ष कपिल इददे, तसेच नगरसेवक, पदाधिकारी आणि नगरविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासह राजुरा शहरातील मायबाप नागरिकांनी मोठ्या उत्साहात उपस्थित राहून नूतन नगराध्यक्षांना शुभेच्छांचा वर्षाव केला.

यावेळी उपस्थितांनी सर्वसामान्यांच्या अपेक्षा, शहरविकासाची नवी दिशा आणि लोकाभिमुख प्रशासनाबाबत आशा व्यक्त केली. नवीन नेतृत्वाखाली राजुरा शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या पदग्रहण सोहळ्यामुळे राजुरा नगरपरिषदेच्या आगामी कार्यकाळाला नवी ऊर्जा, सकारात्मक सुरुवात आणि विकासाभिमुख दिशा मिळाल्याचे चित्र दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here