Home
Home गडचांदूर / कोरपणा !!पिंपळगाव येथे क्रांतिज्योती साविञीबाई फुले जयंती उत्साहात साजरी !!

!!पिंपळगाव येथे क्रांतिज्योती साविञीबाई फुले जयंती उत्साहात साजरी !!

 

नांदा फाटा: रविकुमार बंडीवार

पिपंळगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले चौक ग्राम पंचायत जवळ हरिदास बाबा देवस्थान माळी समाज स्थळ येथे क्रांतीज्योती साविञीबाई फुले जंयती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. दिपक मडावी सरंपंच पिपंळगाव तसेच प्रमुख पाहुणे मा. भास्कर पा. जोगी तंटामुक्ती अध्यक्ष पिपंळगाव व मा. बंडुजी बोढाले अध्यक्ष शालेय शिक्षण समिती पिपंळगाव गावामध्ये यामध्ये शालेय विद्यार्थ्याचे भाषण व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले तसेच शिक्षक वृंदा मधुन मा. गोरे सर यांनी साविञी बाई फुले यांच्या जिवन चरिञावर सांवाद साधला तसेच मा. भास्कर पाटिल जोगी यांनी या कार्यक्रमाच्या अनुसंघाने साविञी बाई फुले जयंती निमित्याने मार्गदर्शन केले भव्यदिव्य प्रभातफेरी व भारूडभजनाचा सहभाग तसेच शालेय विद्यार्थी व समस्त गावकरी मंडळ, माळी समाजातील लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला होता

या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाली विधाते व कार्यक्रमाचे सुञसंचालन रक्षा गिरसावळे यांनी केले व आभारप्रदर्शन रमेश लोनबले यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here