Home
Home Breaking News आ. सुभाष धोटेंनी साधला काँग्रेसच्या बुथ प्रतिनिधींशी संवाद. ♦️नवनिर्वाचीत सरपंच व...

आ. सुभाष धोटेंनी साधला काँग्रेसच्या बुथ प्रतिनिधींशी संवाद. ♦️नवनिर्वाचीत सरपंच व युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सत्कार

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना :– चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी घटे सेलिब्रेशन हाल, कोरपना येथे कोरपना तालुक्यातील काँग्रेसच्या बुथ प्रतिनिधी आणि विविध आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी महत्त्वपूर्ण संवाद साधला. तसेच यावेळी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते कोडशी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचीत सरपंच पूनमताई जरिले आणि नवनियुक्त युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रेमसागर विजय बोंडे, यु. काँ. शहराध्यक्ष महावीर खटोड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. सुभाष धोटे यांनी सांगितले की, तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व बूथ प्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली भूमिका आणि जबाबदारी समजून घ्यावी आणि अधिकाधिक जनसंपर्क वाढवून जनतेच्या समस्या पोटतिडकीने सोडविण्याला प्राधान्य द्यावे. आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून अधिकाधिक वेळ पक्ष कार्यासाठी देवून काँग्रेसचे संघटन मजबूत करावे. काँग्रेसची विकासकामे जनमानसाच्या लक्षात आनुन द्यावीत असे आवाहन केले. तर उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मार्गदर्शनात काँग्रेसचे हात मजबूत करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले.
या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, जि. प. सदस्य सिताराम कोडापे, प. स. सभापती श्यामभाऊ रणदिवे, उपसभापती संभाजी कोवे, सुरेश पाटील मालेकार, कृ. उ. बा. स. सभापती अशोकराव बावणे, संचालक गणेश गोडे, उपनगराध्यक्ष इस्माईल शेख, नगरसेवक निसार शेख, दामोदर मालेकर, मुरलीधर बल्की, राहुल मालेकर, वनकर सर, राजु यलम, साईनाथ काकडे, जय विधाते यासह कोरपना काँग्रेसचे नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here