Home
Home चंद्रपूर आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश देत जागतिक आदिवासी दिवस साजरा

आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश देत जागतिक आदिवासी दिवस साजरा

by : Priyanka Punvatkar

चंद्रपूर : जागतिक आदिवासी दिनानिमित्त विश्वास सोशल फाउंडेशन व छत्रपती शाहू राजे बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने इंदिरा नगर, राजुरा येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. आदीवासी पोषाख परिधान करून गोंडी नृत्य वसाहतीतील बाल कलाकारांनी सादर केले.
आदिवासी संस्कृतीचा वारसा सर्वांनी जपावा असे मार्गदर्शन आदिवासी महिला अध्यक्ष सीमा मेश्राम यांनी केले, तसेच यामध्ये उपस्थित असणाऱ्या विश्वास सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष यिशिता काळे यांनी आदीवासी संस्कृती विषयी माहिती दिली.
सौ.सीमा मेश्राम, यिशिता काळे, मंगला काळे, आशिया सय्यद,शमिम शेख आदी प्रमुख पाहुणे कार्यक्रमाला उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here