बोरी नवेगावची प्रांजली राष्ट्रीय स्पर्धेत

by : Shankar Tadas
गडचांदूर :
पंजाब राज्यातील चंदीगड येथे झालेल्या ‘ऑल इंडिया इंटर युनिवर्सिटी वूमन सेपक टकरा चॅम्पियनशिप’करिता गोंडवाना विद्यापीठातून बोरी नवेगाव येथील प्रांजली देवेंद्र कारेकर हिची निवड झाली होती. देशातील विविध विद्यापीठातून खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रांजली कारेकर ही गुरुकुल महाविद्यालय, नांदा येथील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असून मणिपूर विद्यापीठाशी तिच्या चमुचा सामना 13 फेब्रुवारी रोजी झाला होता. जिवती, कोरपना, गडचांदूर येथील खेळाडूंना जिवती येथील विदर्भ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा शाक्य आणि शरद पवार महाविद्यालयाचे अंकुश मोहुर्ले सर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत सहभागी होता आले. मात्र या नवीन खेळाचा पुरेसा सराव नसल्याने सामना जिंकता आला नसल्याचे खेळाडूंचे म्हणणे आहे. मात्र राष्ट्रीय स्पर्धेत सहभागाबद्दल खेळाडू व मार्गदर्शकाचे अभिनंदन होत आहे.
#gurukulcollegenanda

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here