केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत आसन खुर्द शाळा अव्वल

 

By : Shankar Tadas

गडचांदूर :

केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आसन खुर्द येथील विद्यार्थ्यांनी माध्यमिक गटात अव्वल स्थान पटकावून आपल्यातील सुप्त गुणांची चुणूक दाखवून दिली आहे.
आवाळपूर केंद्रातील या स्पर्धेत माध्यमिक विभागातील कु. नंदिनी सुरेश पेंदोर हिने वादविवाद स्पर्धा व बुद्धिमापन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. संकेत विठ्ठल भोगे या विद्यार्थ्यांने कथाकथन स्पर्धा व स्वंयस्फुर्त भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक तर कु. दर्शना विठ्ठल रणदिवे हिने सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व स्मरणशक्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. कु.लावण्या सुनील आडे या विद्यार्थिनीने स्वंयस्फुर्त लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक आणि कु. कोयल भीमराव मडावी या विद्यार्थिनीने एकपात्री भूमिका अभिनय या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. प्राथमिक गटात कु. जान्हवी जंगशाव आडे या विद्यार्थिनीने एकपात्री भूमिका अभिनय स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.

या स्पर्धेतील यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणारे सहायक शिक्षक  तुकाराम धंदरे यांना दिले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक मारोती सोयाम , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी व सहायका शिक्षिका हर्षदा शेंडे  यांनी विजेत्या नवरत्न विद्यार्थ्यांचे पुषपगुच्छ देऊन अभिनंदन केले व तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

******

लोकदर्शन

9850232854

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here