माजरी पोलिसांचे का होतेय कौतुक..?

By : Shankar Tadas
चंद्रपूर :
मनात आणले तर माणूस काहीही करू शकतो. हेच तर माणसाचे मोठेपण होय. सरकारी कर्मचारी म्हटला तर तो फक्त पैशासाठी नोकरी करतो त्याला लोकांचे काहीही देणेघेणे नसते अशा धारणा लोकांमध्ये दिसून येतात. त्यातही पोलीसदादाची प्रतिमा ग्रामीण भागात भलतीच नकारात्मक दिसून येते. मात्र भद्रावती तालुक्यातील माजरी पोलिसांनी एका शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून चालविलेली धडपड कौतुकाचा विषय ठरत आहे.
थोराणा गावच्या कृष्णाराव झट्टे यांचे सोयाबीन त्यांच्या शेतातील शेडचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी लांबविले. सदर शेतकऱ्याने याबद्दल माजरी पोलिसांत तक्रार दिली. घटना 17 डिसेंबर 2022 रोजी रात्रीची. 30 ते 32 क्विंटल सोयाबीन चोरीस गेल्याने शेतकऱ्यावर जणू डोंगरच कोसळला. मात्र माजरी पोलिसांनी त्यांना दिलासा देत प्रयन्त सुरू केले. त्यांनी एक आवाहन सोशल मीडियात पसरविले. गावोगावी माहिती पोहोचली. जे कोणी खरेदीदार आहेत त्यांनीच हे चोरीचे सोयाबीन खरेदी केले असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे याप्रमाणे सोयाबीन खरेदी झाली असेल तर पोलिसांना कळवावे असे आवाहन करून पोलिस ठाणे आणि अधिकारी यांचा मोबाईल नंबरही प्रसारित केला. त्यांच्या या प्रयत्नाला कितपत यश येते हे फारसे महत्वाचे नाही. मात्र गुन्हेगाराला शोधण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेऊन माजरी पोलिसांनी चोराला जेरबंद करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे हे निश्चित.

****

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर

9850232854

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here