Home
Home Breaking News शरदराव पवार महाविद्यालय द्वारा महिला कबड्डी शिबिराचे आयोजन*

शरदराव पवार महाविद्यालय द्वारा महिला कबड्डी शिबिराचे आयोजन*

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे शरदराव पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह यांच्या मार्गदर्शना अंतर्गत दिनांक 9 ऑक्टोंबर 2022 ते 22.ऑक्टोबर.2022 पावेतो विद्यार्थिनीच्या महिला कबड्डी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्र . सिंह यांच्या नेतृत्वात सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन डॉ. राजेश गायधनी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शरदराव पवार महाविद्यालयातील सातघरे, विवेक बारसागडे ,मनीष राठोड ,किशोर आत्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. शरदराव पवार महाविद्यालयातील बी, ए च्या एकूण 67 विद्यार्थिनीनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या शिबिराचे प्रशिक्षक अंकुश मोरे,भाविक पेन्दोर, समीर भोयर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शरदराव पवार महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत,
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here