माणिकगड रेल्वे स्थानकावर सुपर फास्ट ट्रेन थांबा द्या. आमदार सुभाष धोटे यांचे संजीव किशोर यांना निवेदन.

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा  दि.20 जुलै:– राजुरा ते चंद्रपूर कडे जाणारा संपूर्ण रस्ता पुरामुळे बंद आहे, त्यामुळे माझ्या भागातील राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यातील लोकांना आरोग्याच्या समस्या व वैयक्तिक कामाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. चंद्रपूर, नागपूर पुराच्या दुस-या बाजूने आजारी व्यक्तींसाठी रेल्वेशिवाय दुसरे साधन नाही, त्यामुळे पूरस्थिती पूर्णपणे निवळेपर्यंत थांबावे, ही विनंती, माणिकगड रेल्वे स्थानकावर सुपर फास्ट रेल्वे ट्रेन, आजारी लोकांसाठी आणि प्रवासी यासाठी त्याची खूप गरज आहे. त्यामुळे राजुरा जवळील माणिकगड रेल्वे स्थानकावर सुपर फास्ट गाडी थांबवण्यासाठी सहकार्य करावे अशा आशयाचे निवेदन आमदार सुभाष धोटे यांनी दक्षिण मध्य रेल्वे चे महाप्रबंधक संजीव किशोर यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here