चिर्ले-उरण येथील ‘काव्य-दरबार’ पावसाळी ‘वर्ष सहल’ बहारदार- आनंददायी- संगीतमय वातावरणात संपन्न.

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 8 ‘काव्य-दरबार’ आयोजित पावसाळी ‘वर्ष-सहल’ ही चिर्ले-उरण येथील अडव्होकेट चंद्रकांतजी मढवी यांच्या ‘अस्तित्व’ या फार्म हाऊस वर आयोजित करण्यात आली. नजीकच्या एकविरा माता मंदिर आणि दुधीला शंकर मंदिर येथे दर्शनाचा लाभ घेतला. जुन्या शेतीवाडी, रानावनाच्या, शाळा-हायस्कूलच्या आठवणींने तसेच कमी-अधिक पावसाने आणि सभोवतालच्या निसर्गरम्य वातावरणाने मने प्रसन्न उल्हासित झाली. चंद्रकांतजी मढवी यांनी चहापाणी, नाश्ता, जेवण याची सोय मीनल माळी, हरिश्चंद्र माळी, के.एम.मढवी आणि जावई यांच्या सहकार्याने उत्तम प्रकारे केली. उपस्थित मान्यवर कवी-साहित्यिक मोहन भोईर, दमयंती भोईर, मीनल माळी, हरिभाऊ घरत, चंद्रकांत मढवी, के. एम. मढवी, हरिश्चंद्र माळी, प्रकाश ठाकूर, अरुण द. म्हात्रे, अनंत पाटील, पुंडलिक म्हात्रे, ए.शा.म्हात्रे. यांनी वेगवेगळे विषयांवरील आपल्या बहारदार रचना काव्य-वाचन आणि काव्य-गायनाने उत्तम प्रकारे सादर केल्या. कवी-गायक अरुण द. म्हात्रे. यांच्या कराओके ट्रॅक कर्ण मधुर ईशस्तवन, आणि गीत-गायनाने माहोल संगीतमय आणि उत्साहीत झाले. संमेलनाच्या अध्यक्षा- दमयंती भोईर यांचे मनोगत आणि मार्गदर्शन छान लाभले. मीनल माळीं यांनी सूत्रसंचालन तर प्रकाश ठाकूर यांनी प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले.अशा प्रकारे ‘काव्य दरबार – वर्ष सहल’ आनंदाने आणि खेळीमेळीने संपन्न झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here