गोशीन रियू कराटेच्या विद्यार्थ्यांची राज्य स्तरावर निवड.

 

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 6.पनवेल तालूका क्रीडा संकुल येथे आयोजित राष्ट्रीय किक बॉक्सिंग दिना निमित्ताने जिल्हा स्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा घेतल्या गेल्या त्यामध्ये गोशीन रियू कराटेच्या उरण व पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी विविध वजनी गटात पदके मिळविली.अमिता अरुण घरत गोल्ड मेडल, अमिषा अरुण घरत गोल्ड मेडल, रोहित शरद घरत गोल्ड मेडल, शुभम म्हात्रे गोल्ड मेडल, अमर घरत सिल्व्हर मेडल,करण प्रदीप पाटील सिल्व्ह मेडल, अंश राजेंद्र म्हात्रे ब्रॉन्झ मेडल अशी पदके पटकाविली आहेत. पदक विजेते उमेदवारांची अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय किकबॉक्सिं स्पर्धेत निवड झाली आहे.सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिहान राजु कोळी , गोपाळ म्हात्रे, राकेश म्हात्रे यांनी केला.तसेच या स्पर्धेत मानसी ठाकूर , संतोष मोकळ, ईशा जैन,महेंद्र कोळी राजेश कोळी यांनी पंच म्हणून काम केले.या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून संपत्ती येलकर आणि जेयेश चोगल उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here