भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त सामुहिक योग महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

लोकदर्शन 👉 मोहन भारती

आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त सामुहिक योग महोत्सवाचे आयोजन श्रीकृष्ण सभागृह कोरपना येथे आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक योग गुरू श्री बंडुजी मोहितकर सर होते प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष,श्री किशोर जी बावणे नगरसेवक कोरपना, श्री ठावरी सर,श्री नंदकिशोर भाऊ गज्जलवार, श्री रमेश पा मालेकर,श्री शशीकांत आडकीने, श्री अमोल आसेकर, श्री नारायण कोल्हे,सौ अल्काताई रणदिवे, सौ इंदिरा ताई कोल्हे, श्री मती जयाताई धारणकर आदी मान्यवर उपस्थित होते श्री बंडुजी मोहितकर सर यांनी योगा प्राणायाम चा वर्ग 1 ते दिड तास घेतला व सर्वांना योग करा व निरोगी राहा असे सविस्तर मार्गदर्शन केले श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांनी श्री बंडु जि मोहितकर सर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व मा पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो या बद्दल मा पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे अभिनंदन केले कार्यक्रमाला उपस्थित सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांचे आभार मानले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री किशोरजी बावणे यांनी केले तर आभार श्री शशिकांत अडकिने यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here