पुरुषानो सावधान लग्न ठरतेय औतघटकेचे

 

लोकदर्शन 👉मोहन भारती

*चंद्रपूर*:-भारतीय परिवार बचाव संघटना चंद्रपूर ची सभा नुकतीच पार पडली “ढासळती विवाह संस्था”या विषयावर प्रदीर्घ,सविस्तर चर्चा झाली विवाह विषयाच्या समस्यांचा डोंगर पुरुषासमोर उभा आहे आणि हा विषय समाज व्यवस्थेसाठी नासुर बनत आहे विवाहानंतर काही दिवसात बायको कडून बल्याकमेलिंग चा प्रकार वाढतांना दिसतोय त्याकरिता पुरुषयांनी सावध व चौकस होण्याची गरज आहे.
कार्यक्रमाला संस्थेचे जिल्हाध्यक्ष डॉ नंदकिशोर मैंदळकर,सुदर्शन नैताम,ऍड सारिका संदूरकर,ऍड धीरज ठवसे,डॉ राहुल विधाते,सचिन बरबटकर,मोहन जीवतोडे,वसंत भलमे, गंगाधर गुरनुले,मोहब्बत खान,नितीन चांदेकर, राजू कांबळे,संजय जंपलवार,स्वप्नील सुत्रपवर,पिंटू मुन,स्वप्नील गावंडे आदी उपस्थित.
बायकांच्या या अतिरेकामुळे विवाहसंस्था मोडकळीस येते की काय असे वाटत आहे आज स्त्री पुरुषांचे लिंग गुणोत्तर प्रमाण देशात हजार पुरुषा मागे 940 स्त्री,महाराष्ट्रात हजार पुरुषा मागे 929 स्त्री,जिल्ह्यात हजार पुरुषा मागे 959 स्त्रिया इतकी तफावत आहे त्यामुळे लग्न संबंधात दलालांचे रॅकेट सुद्धा सक्रिय झाले आहे तसेच स्त्री महिला संवरक्षण कायद्याचा गैरवापर करून आज लग्न उद्या सोडचिट्ठी करण्यासाठी पैस्याची अवास्तव मागणी करणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे .पुरुषयाने पैस्याची मागणी मान्य न केल्यास पुरुषांना हुंडाबळी कायद्याचा धाक दाखवून,गजाआड करण्याची भीती दाखवून पैसा उखळायचा हा व्यवसाय होत आहे.तेंव्हा पुरुषयांनी सावध होण्याची गरज आहे या प्रकरणात पुरुषयांची फसगत होते अरेंज म्यारेज असो वा लव्ह म्यारेज असो यात पुरुषांना फसविणारी टोळी सक्रिय झालेली आहे.विघ्नसंतोषी आई वडीलही मुलीला मोहरा बनवून तिच्या पतीला व सासरला लुटण्याचे काम कायद्याचे आड करीत आहे विवाह करून पतीला व सासरला लुटणाऱ्या महिलांना वचक बसायला हवा या करिता शासनाने योग्य पावले उचलायला हवे अन्यथा आदर्श कुटुंब व्यवस्था मोडकळीस आल्याशिवाय राहणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here