मुख्याधिकारी हाजीर हो

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर

🤾🏼‍♂️ग्रिनजीम प्रकरणी उच्च न्यायालयाचा नोटीस

गडचांदूर :
कोरपना तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेत साहाय्य निधी अंतर्गत शहरातील ओपनस्पेस मध्ये 11 ठिकाणी अंदाजे 59 लाखांचे ओपन ग्रिनजीम बसवण्यात आले.काही दिवसाच यातील काही वस्तू मोडकळीस आल्या. सदर जिमच्या वस्तू अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याचे आरोप सुरूवातीपासुनच नागरिकांकडून होताना दिसत आहे. सदर कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त करत यासंदर्भात सखोल चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करावी अशी मागणी वजा तक्रार नगरपरिषदेत भाजपचे विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे यांनी जिल्हाधिकारी व नगरविकास मंत्रालय यांच्याकडे केली होती.बरेच दिवस लोटूनही तक्रारीची दखल न घेतल्याने अखेर डोहे यांनी 28 आॕक्टोंबर 2021रोजी उच्च न्यायालयात रिट पिटीशन क्र 5082/2021 दाखल केली.त्या संदर्भात येत्या 24 जून रोजी न्यायालयात सुनावणी असून गडचांदूर मुख्याधिकारी,नगरविकास सचिव मंत्रालय मुंबई व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना याबाबतचा खुलासा दाखल करण्यासाठीची नोटीस उच्च न्यायालयाने बजावली आहे.आता यावर मुख्याधिकारी व इतर काय खुलासा देणार आणि मा.उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे गडचांदूरकरांचे लक्ष लागले आहे.आणखी बऱ्याच तक्रारी केल्या असून अजूनही चौकशी होत नसल्याने परत उच्च न्यायालयात जाणार असल्याचे मत नगरसेवक अरविंद डोहे यांनी व्यक्त केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *