*लोकदर्शन प्रतिनिधी – हनुमंत सुरवसे, हवली, पुणे*
=====================
लोणी काळभोर मधील माळी मळा या ठिकाणची वाढती लोकसंख्या लक्षात घेता व नागरिकांची होणारी गैरसोेय लक्षात घेऊन या ठिकाणी एखादे ATM मशीन बसविण्यात यावे असे निवेदन आज लोणी काळभोर ग्रामपंचायत च्या विद्यमान सदस्या मा.सौ.ललिता ताई राजेंद्र काळभोर यांना देण्यात आले, माळी मळा या ठिकाणच्या नागरिकांना ATM मधून पैसे काढण्यासाठी 3 किलोमीटर अंतर लांब जावे लागत आहे, गोरगरीबांना हेच अंतर जाण्यासाठी पायी जावं लागत आहे त्या मुळे त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता लवकरात लवकर या ठिकाणी ATM मशीन बसविण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहे.
तसेच आपण केलेली मागणीला लोणी काळभोर ग्रामपंचायत च्या वतीने विद्यमान सरपंच मा.सौ.माधुरीताई काळभोर यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर या समस्याचे निवारण करण्यात येईल असे सौ.ललिताताई काळभोर यांनी बोलताना सांगितले.
यावेळी लोणी काळभोर चे मा.उपसरपंच राजेंद्र आबा काळभोर, युवा नेते तानाजी मोहोळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे हवेली तालुका उपाध्यक्ष शुभम काळे, उद्योजक अक्षय तांगडे, विकास कुंभार, सागर हेंबाडे व नागरिक हे सर्व उपस्थित होते.

