अमरावती तहसील कार्यालय येथे आ. सौ . सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण* *फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारातून पुरोगामी महाराष्ट्राची जडण घडण* *महाराष्ट्र दिन कार्यक्रमात आ. सौ . सुलभाताई खोडके यांचे प्रतिपादन                                                             

लोकदर्शन👉 मोहन भारती


*अमरावती ०१ मे* महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त अमरावती तहसील कार्यालय येथे आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते धजारोहण करण्यात आले. यावेळी ध्वजारोहणानंतर सामूहिक राष्ट्रगान करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली . यावेळी आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी सर्व उपस्थितांसह अमरावतीकर नागरिकांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले , तहसीलदार संतोष काकडे , नायब तहसीलदार दिनेश बढीये , सुनिता रासेकर , नायब तहसीलदार प्रवीण देशमुख, प्रवीण ढोले, आदींसह अमरावती तहसील मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . फुले शाहू आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांतून पुरोगामी महाराष्ट्राची जडण घडण झाली . पाहता पाहता ६२ वर्षाचा काळ लोटला असतांना महाराष्टाने सर्वच क्षेत्रात प्रगती साधली . शेती , उद्योग , शिक्षण , क्रीडा , क्षेत्रात अग्रणी राहून आज लोककल्याणाची संकल्पना राबवून लोकाभिमुख शासन व प्रशासन पारदर्शकपणे व गतीने काम करत आहे. अमरावती मध्ये सुद्धा विकासाचे पर्व नांदत असून नावीन्य पूर्ण विकासातून शहर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कोरोना काळानंतर आता सर्वच यंत्रणा व जनजीवन पूर्वपदावर आले असून श्रमजीवी घटकाला सुद्धा न्याय देण्यात येऊन विकासाची संकल्पना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचाव्यात यश मिळाले असल्याचे प्रशंसनीय गौरवोद्गार आ. सौ , सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केले . यावेळी उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले यांनी महाराष्ट्राच्या गौरव व लौकिका बाबत माहिती दिली . तर तहसीलदार संतोष काकडे यांनी लोकाभिमुख प्रसाशन व गतिमान विकासावर संबोधन करून जनकल्याणाची संकल्पना विशद केली .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *