Home
Home Breaking News कळमना येथे सार्वजनिक शौचालयाचे भुमीपुजन.

कळमना येथे सार्वजनिक शौचालयाचे भुमीपुजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक सुलभ शौचालयाचे भुमीपुजन करण्यात झाले. गाव सुंदर व स्वच्छ करण्याचा तसेच गावातील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक हेतू घेऊन कळमनाचे सरपंच तथा काँग्रेसचे ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई हे काम करीत असून सार्वजनिक सुलभ शौचालयाचे निर्माण कार्य त्यांच्या याच भुमिकेतून आज संपन्न झाले आहे.
या प्रसंगी कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, ग्रामसेवक नारनवरे, स्वच्छ भारत मिशन अभियंता आंबटकर, गौरव भोयर, वाघाडे, सुनील मेश्राम यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here