जिल्हा परिषद अंतर्गत सांगोडा येथे 10 लक्ष रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,

गडचांदूर:
कोरपना तालुक्यातील सांगोडा येथे जिल्हा परिषद चंद्रपूरच्या जिल्हा सुविधा निधीअंतर्गत 10 लक्ष रूपयांचे कामाला मंजुरी मिळाली असून स्मशाभुमीपर्यंत चा रोडचे भूमिपूजन चंद्रपूर जिल्हा परिषदेचा सदस्या विनाताई मालेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरपना पंचायत समिती च्या सभापती रूपालीताई तोडासे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुताई आस्वले उपसभापती कोरपणा, संजनाताई बोंडे, सरपंच सांगोडा, वामण पा.मुसळे माजी सरपंच, सुरेश पा.मालेकर सामाजिक कार्यकर्ते, सचिन बोंडे माजी सरपंच सांगोडा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजयभाऊ कोल्हे अध्यक्ष तं.मु.स. सांगोडा, ग्रामपंचायत सदस्या ज्योतीताई धोटे, सरिताताई देवाळकर, प्रियंकाताई रागिट, ग्रामपंचायत सदस्य विजय लांडे,बंडु भगत,ग्रामसेवक कुरडे साहेब, विकास अवताडे अध्यक्ष शा.व्य.स. सांगोडा, विकास भोयर,बापुजी आगलावे, माणिकराव देवाळकर, सुधाकर भोयर,संजय ढवस,रामचंद्र हनुमंते,महादेव हनुमंते, राजू बोंडे, निशांत पिंपळकर रविंद्र देवाळकर, दिगांबर धोटे, गावातील युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here