लोकदर्शन 👉 मोहन भारती


,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
⭕*स्पर्धेला उदंड प्रतिसाद भित्तीचित्र स्पर्धेत 38 तर रांगोळी स्पर्धेत 34 विद्यार्थी सहभागी*
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
-शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मतदार जनजागृती अभियान अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भित्तीचित्र स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
सदर स्पर्धा मतदार जनजागृती, बेटी बचाव बेटी पढाव, पर्यावरण, लसीकरण अभियान, प्लास्टिक निर्मूलन या विषयाचे आशय घेऊन विद्यार्थ्यांकरता आयोजित करण्यात आली होती.
सदर आयोजित भित्तीचित्र स्पर्धेत 38 विद्यार्थी तर रांगोळी स्पर्धेमध्ये 34 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उपरोक्त विषयावर सुंदर पोस्टर पत्रक व रांगोळी काढून विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीआणि समाज प्रबोधनाचा संदेश दिला आहे.
या रांगोळी स्पर्धेचे परीक्षण डॉ.हेमचंद्र दुधगवळी तर भित्तिचित्र स्पर्धेचे परीक्षण डॉ. सुनील बिडवाईक सर यांनी केले सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून सदर कार्यक्रमाच्या येशस्वितेसाठी रासेयो चे कार्यक्रम अधिकारी डॉ. शरद बेलीरकर ,गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.संजय गोरे,डॉ. राजेश गायधनी डॉ.माया मसराम, डॉ. सत्येंद्रा सिंह प्रा. मंगेश करंबे यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी सर्व शिक्षकेतर कर्मचाचारी व विध्यार्थी त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले स्पर्धेमध्ये बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते
,




