12 वी परीक्षेला सुरुवात ,,,,,,,,,,,,,,,,, कोरपना तालुक्यात 5 मुख्य परीक्षा केंद्र व 11 उपकेंद्रावर 1676 विद्यार्थी।                                               

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ च्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12 वी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला आज 4 मार्च पासून सुरुवात झाली, आज च्या इंग्रजी विषयाला सर्वाधिक विद्यार्थी बसले आहेत,
कोरपना तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय,गडचांदूर येथे परिरक्षक कार्यालय असून याअंतर्गत 5 मुख्य परीक्षा केंद्र व 11 उप परीक्षा केंद्र निर्माण केले असून एकूण 1676 विद्यार्थी परीक्षा देत आहेत,सर्वाधिक विद्यार्थी महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर परीक्षा केंद्रावर/494आहेत,
मुख्य परीक्षा केंद्रमध्ये महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर,,सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय,गडचांदूर,
वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय, कोरपना,प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय, नांदा,संगीता चटप कनिष्ठ महाविद्यालय, कोरपना चा समावेश आहे,
परिरक्षक म्हणून कोरपना पंचायत समिती चे शिक्षणविस्तार अधिकारी सचिन मालवी,सहाय्यक परिरक्षक म्हणून विषय तज्ज्ञ विकास भंडारवार कार्यरत आहेत,त्यांनी कोरपना तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here