जेष्ठ समाजसेवक द्वारकानाथ सोनटक्के यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

लोकदर्शन 👉 राहुल खरात

पुणे/उत्तमनगर– जेष्ठ समाजसेवक कै.द्वारकानाथ तबाजी सोनटक्के रहाणार उत्तमनगर, पुणे यांचे वयाचे 86 वर्षी अल्पशा आजाराने दि.25 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8.30 वा.दुःखद निधन झाले.
त्यांचे मागे 2 मुले आणि 4 मुली जावई, सुन, नातवंडे, पतवंडे मोठा परिवार आहे. त्यांचे पत्नीचे नुकतेच 2 महिन्यापूर्वी निधन झाले त्यामुळे सोनटक्के परिवारावर हा दुसरा आघात झाल्याने उत्तमनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.ते दोघे पती पत्नी अनेक ठिकाणी सामाजिक कार्य करीत होते.त्यांनी नुकतेच जावई सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या सातारा वावरहिरे या गावातील बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रास फुले शाहु आंबेडकर सावित्रीबाई यांच्या पुतळा बसविण्यासाठी आर्थिक मदत केली होती.त्यांचा लहानापासून मोठया सर्व व्यक्तीना हात जोडून नमस्कार करणे हा नम्रपणा व तसेच एन डी ऐ ( NDA ) मध्ये 30 वर्षे कमांडर यांच्या गाडीवर वाहन चालक म्हणून उत्तम सेवा केल्याने त्यांनी परिसरात नातेवाईकांना मध्ये वेगळे स्थान निर्माण केले होते.
या प्रसंगी पुणे विध्यार्थी गृहाचे कार्यवाह प्रा.राजेंद्र कांबळे, रामराज्य बँकेचे मा. अध्यक्ष बाळासाहेब रायकर,माळी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष हनुमंत टिळेकर ,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय सहसचिव प्रा.सुदाम धाडगे,व अनेक संस्था ,संघटना पदाधिकारी यांनी अंत्यविधी प्रसंगी श्रद्धांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here