By : Ashok Bhagat
चंद्रपूर :- आज रोजी दि.१७/२/२०२२ला महाराष्ट्र राज्य नर्सेस संघटना शाखा चंद्रपूर यांच्या वतीने दिनांक 23 व 24 फेब्रुवारी 2022 ला होणाऱ्या संपात जिल्हाभरातील सर्व नर्सेस या संपात सहभागी असेल या साठी आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना संघटना कार्यकारिणी सभासदांनी निवेदन दिले. हा संप आरोग्य कर्मचारी व इतर शिक्षक शिक्षकेत्तर सरकारी निमसरकारी,कर्मचाऱ्याचा राज्यव्यापी संप आहे.यात अनेक वर्षापासून आरोग्य विभागाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहे.अनेक घातक धोरण कर्मचाऱ्यावर लादले जातात.कोविड काळात देशाची सेवा करणाऱ्या शिपाया सारखे आरोग्य कर्मचारी यांनी आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा दिली पण शासन दरबारी याची दखल घेतल्या जात नाही.अनेक प्रश्न मार्गी लावल्या जात नाही याचा कर्मचाऱ्यांमध्ये असलेला संतापाचा उद्रेक या संपातून दिसेल.प्रमुख 14मागण्या शासनाने मंजूर कराव्या म्हणून हा 2दिवसाचा राज्यव्यापी लाक्षणिक संप आहे. निवेदन देताना जिल्हा सचिव रंजना कोहपरे,सहसचिव चित्रा नागरे,सरिता गेडाम, कार्याध्यक्ष अर्चना पोहळेजिल्हा संगटक जोत्सणा खिरतकर,सुनंदा आत्राम,जिल्हा सल्लागार दुर्गा गेडाम,ममता चिलके,लता घोरूदे पंचशील मेश्राम,सुनिता कुंभारे,राजश्री येवतीकर व संघटना पदाधिकारी उपस्थित होते.